शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सवाची तयारी...थाट सोलापुरी...; छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टीकर्सने सोलापुरातील तरूणाईचे मोबाईल्स सजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:48 IST

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा आता मोबाईल स्टीकरवर पाहता येणार आहेत. भावमुद्रा टिपताना मॅट अन् ग्लॉस इंकचा ...

ठळक मुद्देमॅट अन् ग्लॉस इंकचा वापर; अनोख्या उपक्रमांनी यंदा शिवजयंती होणार साजरी येत्या १९ फेब्रुवारी रोजी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे शहरातील मोबाईल शॉपीमध्ये छत्रपतींचे विविध भावमुद्रा असलेले स्टीकर

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा आता मोबाईल स्टीकरवर पाहता येणार आहेत. भावमुद्रा टिपताना मॅट अन् ग्लॉस इंकचा पुरेपूर वापर केला आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील मोबाईल शॉपीमध्ये स्टीकर खरेदीसाठी युवकांची गर्दी होत आहे.येत्या १९ फेब्रुवारी रोजी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. तत्पूर्वी शहरात विविध उपक्रमांच्या आयोजनाची तयारी होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मोबाईल शॉपीमध्ये छत्रपतींचे विविध भावमुद्रा असलेले स्टीकर पाहावयास मिळत आहे. या स्टीकरच्या माध्यमातून राजे छत्रपतींचे स्मरण तर होईलच, शिवाय त्यांची शिकवणही आजच्या युवा पिढींना मिळणार आहे. 

मोबाईल शॉपीमध्ये मिळणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध भावमुद्रा असलेले हे स्टीकर मुंबई, पुणे येथून मागविण्यात आल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. 

हे स्टीकर्स खरेदी करण्यासाठी आता सोलापुरातील तरूणाई सरसावली असून, मोबाईलच्या मागच्या बाजूवर आपल्याला जो आकार लागेल, त्या आकारातही स्टीकर उपलब्ध आहेत. याशिवाय मोबाईलच्या रिंगटोनमधूनही छत्रपती शिवाजी महाराजांचे जयजयकारही ऐकावयास मिळत आहे. 

शिवाजीराजेंची असेही स्मरण होईल- जाधव- सोलापुरात शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते. सर्वच जाती-धर्मातील युवकांची क्रेझ पाहून मी माझ्या शॉपमध्ये स्टीकर मागविले आहेत. स्टीकरवरील छत्रपतींच्या विविध छटा युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. हे स्टीकर्स खरेदीसाठी मोठ्या संख्येने तरूणांची गर्दी होत आहे, असे विक्रेता स्वप्नील जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMobileमोबाइल