मोहोळ-वडवळ रस्त्यावर प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST2021-01-08T05:10:20+5:302021-01-08T05:10:20+5:30
मोहोळ : एका प्रेमीयुगुलाने एकाच स्कार्फने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. भूषण धनंजय पडवळकर (वय १९, रा. देशमुख ...

मोहोळ-वडवळ रस्त्यावर प्रेमीयुगुलाची आत्महत्या
मोहोळ : एका प्रेमीयुगुलाने एकाच स्कार्फने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. भूषण धनंजय पडवळकर (वय १९, रा. देशमुख गल्ली, मोहोळ) आणि वैष्णवी नामदेव थोरे (वय १७, रा. स्टेशनरोड, मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या त्या प्रेमीयुगुलाचे नाव असून, बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान बी.पी.एड महाविद्यालय परिसरात त्यांचे मृतदेह आढळून आले.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार भूषण आणि वैष्णवी यांच्यात प्रेमसंबंध होते. ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान त्या दोघे मिळून मोहोळ - वडवळरोडवर बी.पी.एड. महाविद्यालय परिसरात आले. एका चिंचेच्या झाडाला एकाच स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याची माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दोघांचेही मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्या दोघांनी प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची खबर संजय विलास पडवळकर यांनी मोहोळ पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय माने करीत आहेत.