जमाव जमवून मारहाण करणाऱ्या सात आरोपींचा अटकपूर्व अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:23 IST2021-09-11T04:23:32+5:302021-09-11T04:23:32+5:30

चप्पळगाव येथील फिर्यादीचे सैपन शेख याचे कोल्ड्रिंक्स दुकान दर्ग्याच्या जागेत आहे. ते काढण्यासाठी सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण ...

The pre-arrest application of the seven accused was rejected | जमाव जमवून मारहाण करणाऱ्या सात आरोपींचा अटकपूर्व अर्ज फेटाळला

जमाव जमवून मारहाण करणाऱ्या सात आरोपींचा अटकपूर्व अर्ज फेटाळला

चप्पळगाव येथील फिर्यादीचे सैपन शेख याचे कोल्ड्रिंक्स दुकान दर्ग्याच्या जागेत आहे. ते काढण्यासाठी सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केली होती. या घटनेत तिघे जण जखमी झाले होते. ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली होती. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. यात अटक होईल या भीतीने शाकीर पटेल नासीर पटेल, खलील पटेल, युन्नूस पटेल, रफिक जमादार, अलीम पटेल, अबुजर पटेल (सर्व रा. चपळगाव) यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर ९ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

या घटनेत फिर्यादी स्वतः व कासिम शेख, अस्लम शेख हे तिघे जण जखमी झाले आहेत. यात आरोपींकडून ॲड. सलीम खतीब तर फिर्यादीकडून ॲड. राज पाटील यांनी काम पाहिले. अधिक तपास पोलीस हवालदार प्रवीण वाळके करीत आहेत.

-----

Web Title: The pre-arrest application of the seven accused was rejected