शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 10:56 IST

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

अकोला- भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मी सोलापुरातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांची आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. बहुजन वंचित आघाडीच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी ही माहिती दिली आहे. परंतु निवडणूक कुठून लढवणार यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढल्यास काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. भाजपाचे शरद बनसोडे हे सोलापुरातून विद्यमान खासदार आहेत. बनसोडे यांनी मोदी लाटेत 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आघाडीसंदर्भात बैठका सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आघाडीकडे 22 जागांची मागणी केली आहे. परंतु काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना तेवढ्या जागा देण्यास तयार नाही. बहुजन वंचित आघाडीला 22 जागा द्यायच्या, राजू शेट्टी यांना दोन जागा द्यायच्या, अन्य मित्रपक्षांना एक-दोन जागा दिल्यावर शिल्लक राहणाऱ्या दहा-बारा जागा आम्ही वाटून घ्यायच्या का, असा सवाल बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला होता. बहुजन वंचित आघाडी 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागा मागत आहे.त्या बैठकीत लक्ष्मण माने म्हणाले होते की, मसुदा काय असावा यावर चर्चा झाली आहे, मात्र अंतिम निर्णय व्हायचा आहे. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होईल. आम्ही 22 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या 22 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९