शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांसाठी सोलापूर जिल्ह्यातील भीमसैनिकांनी घेतला एकीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:48 IST

प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला विरोध नको म्हणून बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी माघार घेतली.

ठळक मुद्देभीमसैनिकांची बुधवारपेठेतील अस्थिविहाराजवळ झाली बैठक बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी माघार घेतली.  प्रथमच वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी दाखल केली

सोलापूर : भीमसैनिकांची बुधवारपेठेतील अस्थिविहाराजवळ बैठक झाली. सर्व गट-तट विसरून निळ्या निशाण्याखाली एक होण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सुभाष बनसोडे, रवी गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे, आनंद चंदनशिवे, कुणाल बाबरे, अजित गायकवाड, अजित गाडेकर आदी उपस्थित होते. 

दरम्यान  प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला विरोध नको म्हणून बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी माघार घेतली.  

बसपातर्फे राहुल सरवदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळेस प्रथमच वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी दाखल केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करू नये, अशी भूमिका बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी घेतली होती. बसपाने त्यांच्या विरोधात उमेदवारी दिल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असे पत्र चंदनशिवे यांनी पक्षप्रमुखांकडे दिले होते. त्यावर सरवदे यांनी चंदनशिवे हे वॉर्डापुरते असून, येथे पक्षाचा प्रश्न आहे, असे म्हटले होते. 

शुक्रवारी उमेदवारी माघार घेण्याचा दिवस होता. दुपारी सरवदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी माघार घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत मागासवर्गीय समाज हा काँग्रेस व भाजपा यांच्या पाठीमागे जात होता.पण यावेळेस प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे पहिल्यांदाच सर्वजण संघटित झाले आहेत़ त्यामुळे आम्ही कशाला विरोध करायचा म्हणून बसपाकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत आहे. बसपाने उमेदवारी मागे घेतल्याने आता माझा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे नगरसेवक चंदनशिवे यांनी म्हटले आहे. या बैठकीस विविध गटांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी