आदर्श पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:32+5:302021-02-05T06:44:32+5:30

कुर्डुवाडी : येथील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दहा महिन्यांच्या संकटावर मात करून ...

Praise of students in Adarsh Public School | आदर्श पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव

आदर्श पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कुर्डुवाडी : येथील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दहा महिन्यांच्या संकटावर मात करून प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पुनरागमन झाल्याने प्रशालेचा परिसर चैतन्याने फुलला होता. या दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२० मधील एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी प्रगती जाधव, प्रीती जगदाळे, स्नेहल जाधव, वैष्णवी खामकर यांना पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. दत्तक पालक योजना विजेते पल्लवी नवगिरे व सोमनाथ खैरे यांचा सन्मान करण्यात आला. आदिशक्ती शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक मोहन सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल सुरवसे, ज्येष्ठ संचालिका आशा सुरवसे, वर्षा सुरवसे, प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका शकीला सय्यद, इंग्रजी माध्यमाचे प्राचार्या शैलेश दरेकर, विभागप्रमुख आयेशा मुलाणी उपस्थित होते

--

फोटो : २७ कुर्डुवाडी आदर्श पब्लिक स्कूल

आदर्श पब्लिक स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमोल सुरवसे, आशा सुरवसे, वर्षा सुरवसे, पूजा सुरवसे, मुख्याध्यापिका शकीला सय्यद.

Web Title: Praise of students in Adarsh Public School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.