इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्रज्ञा विजय घोरपडे हिने नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय पश्चिम विभागीय जंपरोप अजिंक्यपद स्पर्धेत ३ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावले. तिची १८, १९ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत ४६ देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रज्ञा कऱ्हाडच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिला क्रीडाशिक्षक अमोल पालेकर, वडील डॉ. विजय घोरपडे, आई डॉ. वसुंधरा घोरपडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. (प्रतिनिधी)
प्रज्ञा घोरपडेला तीन सुवर्ण
By admin | Updated: August 11, 2014 00:17 IST