माळेगाववर गावचा विकास पॅनलची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:05+5:302021-01-25T04:23:05+5:30

टेंभुर्णी : विधानसभा निवडणूक लढलेले संजय कोकाटे यांच्या गावचा विकास पॅनलने ९ पैकी ६ जागा जिंकत माळेगावावर सत्ता कायम ...

Power of Village Development Panel over Malegaon | माळेगाववर गावचा विकास पॅनलची सत्ता

माळेगाववर गावचा विकास पॅनलची सत्ता

टेंभुर्णी : विधानसभा निवडणूक लढलेले संजय कोकाटे यांच्या गावचा विकास पॅनलने ९ पैकी ६ जागा जिंकत माळेगावावर सत्ता कायम ठेवली. त्यांचे विरोधी गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक शिवाजी पाटील यांच्या रोकडाई देवी विकास पॅनलने तीन जागांवर विजय मिळवला आहे. आमदार शिंदे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागले होते. संजय कोकाटे गटाचे उमेदवार तुकाराम हरिदास गायकवाड, छाया महादेव लोंढे, पूजा सुदर्शन गायकवाड, बळीराम लक्ष्मण अनंतकवळस, भगवान शांतीलाल कोकाटे व आनंदा कांतीलाल लोंढे हे विजयी झाले. शिवाजी पाटील गटाचे संग्राम शिवाजी पाटील, शहाजी पांडुरंग मदने व जयश्री अमर गायकवाड हे तीन उमेदवार विजयी झाले.

--

फोटो: २४ टेंभुर्णी

माळेगाव ग्रामपंचायत निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांसह आनंद व्यक्त केला.

Web Title: Power of Village Development Panel over Malegaon