शेतीपंपाचा वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:22+5:302020-12-05T04:44:22+5:30
यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते भानुदास शिंदे, ॲड. ...

शेतीपंपाचा वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा
यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते भानुदास शिंदे, ॲड. जितूभाई आडेलकर, लालासोा पाटील, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा नीता खोत, दीपक पगार, प्रा. एन डी चौगुले, आदिनाथ कपाळे उपस्थित होते.
रात्री वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वन्यजीव प्राणी, सर्पदंश, विजेचा शॉक होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा केला तर शेतकऱ्यांचे प्राण वाचतील .तसेच इतर राज्यांप्रमाणे शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणीही प्रा. सुहास पाटील यांनी निवेदनात केली.
फोटो ओळी
०३टेंभुर्णी०१
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील. शेजारी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत.