Power remains in Malegaon | माळेगावात सत्ता कायम

माळेगावात सत्ता कायम

टेंभुर्णी : विधानसभा निवडणूक लढलेले शिवसेेनेचे संजय कोकाटे हे माळेगावची सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले. त्यांच्या ‘गावचा विकास पॅनल’ने नऊपैकी सहा जागा जिंकल्या आहेत. विरोधी गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवाजी पाटील यांच्या रोकडाई देवी विकास पॅनलने तीन जागेवर विजय मिळवला आहे.

आमदार शिंदे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरवल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागले होते. गावचा विकास पॅनलमधून तुकाराम हरिदास गायकवाड, छाया महादेव लोंढे, पूजा सुदर्शन गायकवाड, बळीराम लक्ष्मण अनंतकवळस,भगवान शांतीलाल कोकाटे व आनंदा कांतीलाल लोंढे हे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजी पाटील गटाचे संग्राम शिवाजी पाटील, शहाजी पांडुरंग मदने व जयश्री अमर गायकवाड हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

Web Title: Power remains in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.