वडापुरात चौकात मटक्याचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST2021-08-22T04:26:32+5:302021-08-22T04:26:32+5:30

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे ग्रामपंचायतीच्या जवळ भर चौकात एक व्यक्ती कल्याण मटका घेत असल्याची माहिती बातमीदाराने मंद्रूप पोलीस ...

Pot market at Chowk in Vadapur | वडापुरात चौकात मटक्याचा बाजार

वडापुरात चौकात मटक्याचा बाजार

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे ग्रामपंचायतीच्या जवळ भर चौकात एक व्यक्ती कल्याण मटका घेत असल्याची माहिती बातमीदाराने मंद्रूप पोलीस ठाण्याला दिली. खासगी वाहनाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकातच रवींद्र बाळू माशाळे (३६, रा वडापूर) हा कल्याण मटक्याचा चार्ट जमिनीवर अंथरून आकडेमोड करीत होता. रस्त्यावरून येणारे जाणारे नागरिक त्याच्याकडे पैसे देत असताना सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडील कल्याण मटक्याचा कागद , मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

त्या व्यक्तीने आपण गोळा केलेली मटक्याची रक्कम सुनील पाटील या एजंटकडे देत असल्याचे सांगितले. त्यामुळे रवींद्र माशाळे आणि सुनील पाटील या दोघांविरोधात जुगार कायदा कलम १२( अ) नुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सागर मठपती यांनी ही कारवाई केली.

----

Web Title: Pot market at Chowk in Vadapur