शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
3
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
4
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
5
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
6
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
7
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
8
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
9
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
10
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
11
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
12
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
13
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
14
Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
15
Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
17
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
18
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
19
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
20
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात ३.३४ लाख  बालकांना पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:16 IST

 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी, ग्रामीण भागात २४१०, नागरी भागात २१० लसीकरण केंद्रांद्वारे लस

ठळक मुद्देग्रामीण व नागरी भागातील ५ वर्षांखालील एकूण ३ लाख ६२ हजार ४३६ बालके सोलापूर जिल्ह्यात ९२.२१ टक्के (३,३४,२०२) बालकांना ही लस पाजण्यात आली

सोलापूर : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाºया राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार २०२ बालकांना पल्स पोलिओची लस देण्यात आली. जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ शासकीय रुग्णालयात मान्यवरांच्या हस्ते बालकांना लस पाजून करण्यात आला. 

शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या बालकांना वैद्यकीय पथकाच्या कर्मचाºयांनी पोलिओची लस पाजली. याशिवाय वर्दळीच्या विविध ठिकाणी, मनपाच्या दवाखान्यातही ही मोहीम राबवण्यात आली. आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील मोहीम जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती शिवानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  राजेंद्र भारुड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, सहा. संचालक भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर यांनी बालकांना पोलिओची लस पाजून करण्यात आला. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर यांची उपस्थिती होती.

सोलापूर जिल्ह्यासाठी पल्स पोलिओ मोहीम जिल्हाधिकारी डॉ.  राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत आहे. सदर मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरुन सहा. संचालक डॉ. भीमाशंकर जमादार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर आले आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुधभाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रशासन अधिकारी आरिफ सय्यद, जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, साथरोग अधिकारी डॉ. राजीव कुलकर्णी, सांख्यिकी अधिकारी अनिलकुमार जन्याराम, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख, जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. 

ग्रामीण भागात २४१०, नागरी भागात २१० लसीकरण केंद्रांद्वारे लस- जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील ५ वर्षांखालील एकूण ३ लाख ६२ हजार ४३६ बालके असून, ग्रामीण भागात २४१० आणि नागरी भागात २१० लसीकरण केंदे्र, ९७ मोबाईल टीम, ट्रांझीट टीम स्थापन करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यात ९२.२१ टक्के (३,३४,२०२) बालकांना ही लस पाजण्यात आली. उर्वरित बालकांना १३ मार्च ते १५ मार्च या तीन दिवसात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी, वाड्यावस्त्यांवर, ऊसतोड, वीटभट्टी आदी ठिकाणी जाऊन लस पाजण्यात येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय