शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

माघी यात्रेनिमित्त पोलीस यंत्रणा सज्ज; पंढरपुरात असणार दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

By appasaheb.patil | Updated: February 19, 2024 12:58 IST

पंढरपुरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले  यांनी दिली.

पंढरपूर :-  माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. २० फेब्रुवारी २०२४ जया एकदशी असून, माघी यात्रा कालावधी २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे. या कालावधीत पंढरपूरात  येणाऱ्या भाविकांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून पंढरपुरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले  यांनी दिली.

वारी कालावधीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी  १ हजार ३९४ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १ उपविभागीय पोलीस अधिकारी,  १० पोलीस निरिक्षिक, ५५ सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस  उपनिरिक्षक, १०  महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस  उपनिरिक्षक ६१८ पोलीस कर्मचारी व ७०० होमगार्ड तसेच एक जलद प्रतिसाद पथक, एक आरसीएफ तुकडी व दोन बीडीडीएस पथके नियुक्त करण्यात आले आहेत. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  नदीपात्र, ६५ एकर, महाव्दार चौक, महाव्दार घाट, पत्राशेड व नामदेव पायरी या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत.  तसेच नदीपात्रासह, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, स्टेशन रोड  आदी ठिकाणी १६२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPoliceपोलिस