शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये पोलिसांनी बनविले पोलिसांसाठी ऑक्सिजन हॉस्पिटल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 01:09 IST

कोरोनाकाळात दिलासा; राज्यातील पहिलाच उपक्रम

ठळक मुद्देपोलिसांनी पाेलिसांसाठी उभारलेल्या रुग्णालयाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. 

अप्पासाहेब पाटीललोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात सगळे लोक घरात बसलेले असताना कुटुंबासह स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र बंदोबस्तावर काम करणाऱ्या पोलिसांसाठी सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांसाठी पंढरपूर येथे ऑक्सिजन हॉस्पिटल निर्माण केले. पोलिसांनी पाेलिसांसाठी उभारलेल्या रुग्णालयाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन , व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर दिसत असतानाच बेड व उपचारासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांना कोणत्याही रुग्णालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, याच हेतूने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापुरात ३० बेडचे कोविड केअर सेंटर व पंढरपुरात ६० बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल उभे केले. लाईफलाईन हॉस्पिटलच्या मदतीने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सद्यस्थितीला पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे ९० टक्के कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णांवर पंढरपुरातील ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

११० जणांनी केली कोरोनावर मात...nपोलीस अधिकारी, कर्मचारी, कुटुंबातील इतर लोकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांवर ऑक्सिजन हॉस्पिटलमधील ६० बेडवर उपचार होत आहेत. nआतापर्यंत या हॉस्पिटलमधून उपचार घेऊन ११० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४२ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात फक्त १ पोलीस कर्मचारी आहे, बाकीचे पोलिसांच्या कुटुंबातील नातेवाईक आहेत.

....हा तर माझा परिवारबेडसाठी पोलीस व त्यांच्या कुटुंबातील लोकांना इतरत्र फिरावे लागू नये, यासाठी ऑक्सिजन हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. सामाजिक भावनेतून याच हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार होत आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दल हा माझा परिवार आहे. परिवाराची प्रमुख म्हणून माझ्या परिवारातील लोकांची काळजी घेणे माझे कर्तव्यच आहे.- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.

 

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या