पोलिसांनी चोरट्याकडून १० मोटारसायकली केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:21 IST2021-04-13T04:21:18+5:302021-04-13T04:21:18+5:30

निमगांव-मगराचे (ता. माळशिरस) येथील सोमनाथ मधुकर गोरवे यांची मोटारसायकल (क्र. एमएच ४५ /आर ५७२३) ९ एप्रिल रोजी अकलूज येथील ...

Police seized 10 motorcycles from the thief | पोलिसांनी चोरट्याकडून १० मोटारसायकली केल्या जप्त

पोलिसांनी चोरट्याकडून १० मोटारसायकली केल्या जप्त

निमगांव-मगराचे (ता. माळशिरस) येथील सोमनाथ मधुकर गोरवे यांची मोटारसायकल (क्र. एमएच ४५ /आर ५७२३) ९ एप्रिल रोजी अकलूज येथील नवीन बस स्थानक येथून चोरीस गेली. याबाबत गोरवे यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अकलूज पोलिसांनी तपासास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्याकडून माहिती मिळविली असता, सदर देविदास बबन वाघमोडे (रा. धाईंजेवस्ती-इस्लामपूर, ता. माळशिरस) हा चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. त्यास अटक करुण चौकशी केली असता, त्याने गोरवे यांच्या मोटारसायकलबरोबर आणखी चोरलेल्या नऊ मोटार सायकली पोलिसांना दिल्या.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अरुण सुगांवकर, एएसआय बाळासाहेब पानसरे, पोहे. रामचंद्र चौधरी, मंगेश पवार, विक्रम घाटगे, सुहास क्षीरसागर, पोना. निलेश काशिद, पो. मनोज शिंदे, नितीन लोखंडे, अमितकुमार यादव, पांडुरंग जाधव, अन्वरा आत्तार (सायबर शाखा सोलापूर) यांनी पार पाडली. पुढील तपास पोना.कोळी करत आहेत.

Web Title: Police seized 10 motorcycles from the thief