जुनोनीत पोलिसांच्या धाडी..१५ हजाराचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST2021-04-02T04:22:55+5:302021-04-02T04:22:55+5:30

याबाबत पोलीस बाबासाहेब पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन व्हनमाने, संगाप्पा हाताळी, श्रीमंत व्हनमाने (तिघे रा. जुनोनी) यांच्याविरुद्ध ...

Police raids in Junoni..15,000 liquor stocks seized | जुनोनीत पोलिसांच्या धाडी..१५ हजाराचा दारुसाठा जप्त

जुनोनीत पोलिसांच्या धाडी..१५ हजाराचा दारुसाठा जप्त

याबाबत पोलीस बाबासाहेब पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन व्हनमाने, संगाप्पा हाताळी, श्रीमंत व्हनमाने (तिघे रा. जुनोनी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या आदेशान्वये पोलीस नाईक दत्ता वजाळे, पोलीस नाईक अभिजित मोहोळकर व पोलीस बाबासाहेब पाटील बुधवारी जुनोनी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलिसांनी जुनोनी ते मिरज रोडवरील विनायक शेटे यांचे गाळयाच्या पाठीमागील बाजूस अवैधरीत्या दारू विक्री करणारा सचिन रामचंद्र व्हनमाने यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील ४ हजार ९९६ रुपयांची दारु, जुनोनीतीलच बाळूमामा नाष्टा सेंटरचे पाठीमागील बाजूस अवैधरीत्या दारू विक्री करणारा संगाप्पा मल्लेशा हाताळी यास ताब्यात घेऊन ५ हजार १२४ रुपयांची व रूद्रा मोबाईल शॉपीच्या पाठीमागील बाजूस दारू विक्री करणारा श्रीमंत रामा व्हनमाने यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४ हजार ९८२ रुपये अशी एकूण १५ हजार १०२ रुपयांचा दारुसाठा जप्त केला.

Web Title: Police raids in Junoni..15,000 liquor stocks seized