शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

तांडोर-तामदर्डी येथील अवैध वाळु उपसा करणाºयांवर पोलीसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 10:47 IST

३ कोटींच्या मुद्देमालासह १७ जण ताब्यात, २९ जणांवर गुन्हा दाखल, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई

ठळक मुद्देभीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून बेसुमार वाळू उपसा सुरूसांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणची वाहने या वाळू उपशामध्ये गुंतली होती

मंगळवेढा : तांडोर (ता. मंगळवेढा) येथील भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाºया ठिकाणांवर जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने रविवारी पहाटे छापे टाकून २० ट्रॅक्टर, ७ ट्रक, ३ जेसीबी, १० मोटरसायकली, एक बोलेरो जीप यासह ११५ ब्रास वाळूसह ३ कोटी रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून २९ वाहनचालकांविरूद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवेढा पोलिसांत सुरू होती. दरम्यान, मंगळवेढा येथे ही वाळूची दुसरी जम्बो कारवाई आहे.

मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील भीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणची वाहने या वाळू उपशामध्ये गुंतली होती. या वाळू उपशाची माहिती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना मिळताच त्यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सपोनि संदीप धांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश मोरे, पोलीस नाईक अमृत खेडकर, पोलीस शिपाई पांडुरंग केंद्रे, श्रीकांत बुरजे, अक्षय दळवी, बाळराजे घाडगे, गणेश शिंदे, सचिन कांबळे, सुरेश लामजाने, अभिजित ठाणेकर, अनुप दळवी, अमोल जाधव, विष्णू बडे, बालाजी नागरगोजे, महादेव लोंढे आदी कर्मचाºयांना रविवारी पहाटे तांडोर येथे छापा टाकण्यासाठी पाचारण केले.

यावेळी पहाटे ५ वाजता भीमा नदीच्या पात्रात २० ट्रॅक्टर, ७ ट्रक , ३ जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरत असल्याचे घटनास्थळी पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकताच वाळूतस्कर सैरावैरा वाहने जागेवर सोडून नदीच्या पात्रात पळू लागले. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाळूतस्करांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी चोहोबाजूंनी गराडा घालून वाहनचालक जयाप्पा सहदेव गायकवाड, हमीद नबीसाब इनामदार, गणेश ज्ञानेश्वर पुजारी, परशुराम रंगनाथ पुजारी, किरण सुरेश नागणे, बिरूदेव विलास मासाळ, वैभव विलास पाटील, बालाजी दगडू मळगे, अर्जुन गोपाळराव जाधव, ओंकार शिवानंद व्हडगे, सागर मारूती बिले, सुरेश उत्तम पवार, विशाल जगन्नाथ पवार, महादेव पंडित अधटराव, उमेश विठ्ठल भार्इंकट्टी, गणेश चंद्रकांत लोखंडे, दामोदर बाळू शिंदे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर रवींद्र उर्फ पपुल्या रामा काळे, उमेश घाडगे, ऋतुराज ताड, सुरेश उर्फ बिबल्या रामा काळे, सचिन काळे, किशोर रामा काळे, विक्या भीमसिंग भोसले, शंकु सुरेश काळे, संजय शरणप्पा भोसले, सूरज शरणप्पा भोसले, अमित शरणप्पा भोसले, शरद पवार हे १२ जण फरार झाले आहेत.

दिल्लीच्या हरित लवादाने जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यावर बंदी घातली असताना येथे मात्र यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात आहे, हे आजच्या घटनेवरून उघड झाले आहे. दरम्यान वाळू कारवाईप्रसंगी सोलापूरहून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागवण्यात आला होता.

मंगळवेढ्यातील वाळूवरील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची ही दुसरी कारवाई आहे. यामध्ये वाळू तस्करांची एक बोलेरो जीप, दहा मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

असा प्रकार घडलाच नाहीवाळू कारवाईप्रसंगी गोळीबार झाला असून, त्यामध्ये एक मयत झाल्याचे वृत्त दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी असा प्रकार घडला नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगून मलाही मुंबईवरून चॅनलवाल्याचे फोन आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसCrimeगुन्हा