२० हजाराची लाच स्वीकारताना पोलीस अधिकारी अटकेत
By Appasaheb.dilip.patil | Updated: July 28, 2017 18:01 IST2017-07-28T18:00:41+5:302017-07-28T18:01:01+5:30
सोलापूर : दि २८ : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नॉमिनल अटक करून जामीनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून २५ हजार रूपये लाचेची मागणी करून २० हजार रूपयांची लाच स्वीकारताना सहा़ पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस स्टेशन यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ सर्जेराव सखाराम शिंदे (वय ५४) असे लाच स्वीकारणाºया पोलीस अधिकाºयाचे नाव आहे़

२० हजाराची लाच स्वीकारताना पोलीस अधिकारी अटकेत
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : दि २८ : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नॉमिनल अटक करून जामीनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून २५ हजार रूपये लाचेची मागणी करून २० हजार रूपयांची लाच स्वीकारताना सहा़ पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस स्टेशन यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ सर्जेराव सखाराम शिंदे (वय ५४) असे लाच स्वीकारणाºया पोलीस अधिकाºयाचे नाव आहे़
तक्रारदार व इतर ५ यांचे विरूध्द लोहमार्ग पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यामध्ये तक्रारदारास उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे़ सहा़ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तक्रारदासास न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नॉमिनल अटक करून जामीनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून २५ हजार रूपयांची लाचेची मागणी करून २० हजार रूपये लाच स्वीकारताना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साळुंखे व सोलापूर टिमने केली़