गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माढ्यात पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:50+5:302021-09-03T04:22:50+5:30
माढ्यासह परिसरातील गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित केली होती. मंडळाच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचा उपक्रमदेखील ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माढ्यात पोलिसांचे संचलन
माढ्यासह परिसरातील गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित केली होती. मंडळाच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचा उपक्रमदेखील मंडळाने हाती घेण्याचे आवाहन करत शहरातील सामाजिक सलोख्याचे कौतुक त्यांनी केले, तर शहरातून पोलीस परेडचे संचालनदेखील करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शेख, अजिंक्यतारा मंडळाचे शंभुराजे चवरे जय भवानी गणेश उत्सव मंडळाचे अक्षय भांगे, अजिंक्य भांगे छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे संजय चांगभले, जगदंबा गणेश मंडळाचे गणेश साळुंके तुकाराम शिंदे, सन्मती कला क्रीडा मंडळाचे महेश गुंड, हरी बंडगर राकेश पवार समाधान सुतार, प्रतीक शिवपुजे, अण्णा शिवपुजे, पिंटू उन्हाळे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
---
020921\img_20210828_170728.jpg
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माढा शहरातून पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले