शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून लूट सुरूच, ट्रकचालक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 10:56 IST

ट्रकचालक वैतागले : टेंभुर्णी परिसरात दोनवेळा पोलिसांकडून लूट

ठळक मुद्देटेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस व मोडनिंबचे हायवे पोलीस यांच्यात एंट्री वसुलीवरुन नेहमी बाचाबाचीटेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस वाहन चालकांची पिळवणूक करतातभीमानगर ते शेटफळ आणि कंदर ते शेटफळ हा मार्ग म्हणजे ट्रक चालकांना अडचणींचा

अरण : देखो साहब, मैं पिछले तीस सालसे हायवे लाईनपर गाडी चलाता हूँ, पुलिसवाले एंट्री तो इस देशमें हर जगह पर ले रहे है! लेकिन टेंभुर्णी के आसपास में हमे दो-दो बार एंट्री के लिए पुलीस परेशान करती है! एंट्री तो लेती है। उपर से गालियाँ देती है, डाँटती है, कभी थप्पड झेलनी पडती है। तो कभी-कभी गाडीके काँचपर पुलीस का डँडा पडता है! हे बोल आहेत पोलिसांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या ट्रक ड्रायव्हरचे. 

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाताना टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस वाहन चालकांची पिळवणूक करतात. टेंभुर्णी पोलिसांच्या कचाट्यातून सुटतो न सुटतो तोच हायवे पोलीस ताव काढतात. त्यामुळे भीमानगर ते शेटफळ आणि कंदर ते शेटफळ हा मार्ग म्हणजे ट्रक चालकांना अडचणींचा चक्रव्यूह भेदल्यासारखे वाटते.

जयपूर ते कोईम्बतूर आणि मुंबई ते चेन्नई या मार्गावरील सर्वात डेंजर टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीस किलोमीटरचा हायवे असल्याचे ट्रक ड्रायव्हरनी सांगितले. 

हायवे पोलीस म्हणतात, आम्हाला वर्षाला सव्वा ते दीड कोटी रुपये दंडाची रक्कम गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.  त्यामुळे आम्ही केसेस करतोय. पण मग पांढरा कागद असणारा बिल्ला दाखवून जाणाºया वाहन चालकाला कसे काय सोडता, या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही. 

 पोलिसातच बाचाबाची- टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस व मोडनिंबचे हायवे पोलीस यांच्यात एंट्री वसुलीवरुन नेहमी बाचाबाची होते. या दोघांत छुपा सवती मत्सर दिसून येत आहे. हाच तो पांढºया कागदाचा बिल्ला. हा बिल्ला ५ डिसेंबरला दिला आहे. ४ जानेवारीपर्यंत चालणार आहे. १०० ते ३०० रुपये हप्ता घेऊन हायवे पोलीस हा बिल्ला देतात, असे ट्रक चालकांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरtraffic policeवाहतूक पोलीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस