पीएम दौरा बंदोबस्त हजेरीच्यावेळी फिट येऊन पडल्यानं पोलीस जखमी
By विलास जळकोटकर | Updated: January 18, 2024 19:58 IST2024-01-18T19:57:39+5:302024-01-18T19:58:10+5:30
रे नगर कुंभार येथील घटना : शासकीय रुग्णालयात उपचार

पीएम दौरा बंदोबस्त हजेरीच्यावेळी फिट येऊन पडल्यानं पोलीस जखमी
सोलापूर : बंदोबस्त हजेरीच्यावेळी फिट येऊन पडल्यानं पोलीस जखमी जखमी होण्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास रे नगर कुंभारी येथे घडली. अभय रमेश जाधव (वय- ३६, रा. चंद्रपूर) असे जखमी पोलिसाचे नाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरातील रे नगर कुंभारी येथे घरकूल लोकार्पणाच्या निमित्ताने येत आहेत. या बंदोबस्ताच्या निमित्ताने अभय जाधव बंदोबस्तासाठी सोलापुरात आले आहेत. सकाळी १० च्या सुमारास बंदोबस्त हजरीसाठी ते थांबले होते. अचानक त्यांंना फिट आली. यात ते खाली पडले. यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली.
अचानक घडलेल्या या प्रकाराने त्यांचे सहकारी जमले. तातडीने वळसंग येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून डाॅक्टरांच्या सल्ल्याने पावणेबाराच्या सुमारास रुग्णवाहिकेद्वारे येथील शासकीय रुग्णालयात त्यांचे सहकारी पोलीस डी. के. व्हनमारे यांनी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, ते शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.