शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

'खाकी' ला मलीन करणाऱ्या पोलीसांना बडतर्फीचे वेसण घालणार : तेजस्वी सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 07:42 IST

पोलीस दलाची प्रतिमा जपा;  मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट

मंगळवेढा : पोलिसांनी आपले सेवाव्रत निष्ठेने जोपासताना मोठ्या कष्टाने कमविलेल्या वर्दीवर कुठलाही कलंक लागणार नाही, याची सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी. मी अधिकारी म्हणून नेहमी पोलीस दलाच्या पाठीशी आहे, मात्र खाकी वर्दीची प्रतिमा मलीन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फीचे वेसण घालू असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिला.

एसपी तेजस्वी सातपुते यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस ठाण्यातील कामकाजाची पाहणी करून पोलिसांशी संवाद साधला. पुढे त्या म्हणाल्या की, पोलीस ठाण्यात येणा-या प्रत्येक नागरिकांची तुम्ही दखल घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली पाहिजे. त्याच्याशी सौजन्याची वागणूक दिली पाहिजे. पोलिस विभाग शिस्तप्रिय आहे. कोणीही कर्मचारी, अधिकारी नियम पायदळी तुडविताना आढळल्यास त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्याने पोलीस दलाची प्रतिमा जपावी.

समाजात वावरताना तुमची वर्तणूक चांगली ठेवली पाहिजे अन्यथा तुमच्या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते. अवैध  व्यावसायकाशी तुमचा कसलाही कॉन्टॅक्ट असता कामा नये तसे आढळून आल्यास मी बडतर्फीची कारवाई करेन असा इशारा पोलिसांशी संवाद साधताना दिला. 

पोलिसांच्या निवासाच्या प्रश्नी पाठपुरावा करू, महिला  सक्षमीकरणसाठी कार्यरत राहू, शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. कर्नाटक सीमेवरील गुटखा तस्करी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करू असे सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहायक पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हयापेक्षा सोलापूर जिल्हा वेगळा असून येथील सर्व पोलिस ठाण्यामधील अधिकार्‍यांशी चर्चा करून संपूर्ण माहिती घेवून जिल्हयात  कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल या दृष्टीने  विशेष प्रयत्न केले जातील. प्रामुख्याने महिला सक्षमीकरणावर भर देवून महिलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातील कर्नाटक राज्यातून सातत्याने येणारा अवैध गुटखा रोखण्यासाठी पोलिसांना अधून मधून अचानक नाकाबंदी लावून सीमेवर वाहनांची  करण्याच्या सूचना केल्या.

मंगळवेढा सबजेल हे ब्रिटीशकालीन असल्यामुळे त्याची पडझड होत आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा  केली जाईल. देशातील महिलांबाबत वाढणार्‍या घटना पाहता महिलांची सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे.यासाठी महिला सक्षमीकरण होणेकामी प्रयत्न केले जातील. मंगळवेढा शहरातून होणारी अवजड वाहतूक तात्काळ थांबविण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. शहरालगत बायपाय रोड असतानाही अवजड वाहने शहरामधून प्रवेश करीत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यापुर्वी अपघात होवून चौघांचा बळी गेल्याचे निदर्शनास पत्रकारांनी आणून दिल्यानंतर सुरक्षितता कमान उभी करून बायपास रस्त्याने वाहने वळविण्याच्या सूचना करण्यात आल्या. पोलिस कर्मचार्‍यांना केवळ २० निवासस्थाने असल्याने राहण्याची अवस्था मंगळवेढयात बिकट आहे.  कर्मचार्‍यांना घरभाडे भत्ता मिळतो,परिणामी कर्मचार्‍याने भाडयाच्या घरात रहावे ज्यांना घरभाडे मिळत नाही त्यांचे घरभाडे मिळवून देवू असे आश्‍वासन यावेळी सातपुते यांनी दिले. पोलिस कर्मचार्‍यांनी कुठल्याही कामात कुचराई न करता चांगले काम करावे. अन्यथा कामात कुचराई करणार्‍यांना तांदळातील खडयासारखे वेचून बाजूला काढून योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा सातपुते यांनी दिला.  

पोलिस नागरिकांसाठी खांदयाला खांदा देवून काम करीत आहेत. मात्र जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे, चोर्‍या रोखण्यासाठी गावपातळीवर सी.सी.टि.व्ही. कॅमेरे लावावेत, गावात अंधार राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलिस पाटील यांनी गावात चोर्‍या होणार नाहीत यासाठी सतर्क रहावे, बाहेरगावी जात असताना प्रत्येकाने शेजार्‍यावर घराकडे लक्ष देण्याची जबाबदारी टाकावी. तसेच घराला छोटे कुलूप लावण्याऐवजी चांगल्या प्रतीचे कुलूप लावल्यास चोर्‍या रोखल्या जातील असेही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिस