शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

५० हजाराची लाच स्वीकारताना पोलिसाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 20:46 IST

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

संताजी शिंदे, सोलापूर : गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच स्वीकारताना, पंढरपुरातील पोलिसाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

वैजिनाथ संदीपान कुंभार (वय ५२ नेमणूक पंढरपूर शहर पोलिस ठाणे, रा. इसबावी पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस नाईकाचे नाव आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात भादवि संहिता १८६० चे कलम २७९, ३३६, ३३८ व मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३४ (ए), १३४ (बी) १७७, १८४ प्रमाणे अज्ञात वाहना विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात मोटारसायकल न दाखवण्यासाठी तसेच तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी पोलिस नाईकाने एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. 

तडजोडी अंति ५० हजार रूपये देण्याचे ठरले. या बाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ही रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैजिनाथ कुंभार यांना रंगेहात  पकडण्यात आले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, हवालदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलिस नाईक स्वामीराव जाधव, शाम सुरवसे यांनी पार पाडली.

टॅग्स :Solapurसोलापूर