दीड लाखाचा मुद्देमाल पळवून चोरट्याने जाताना हॉलला कडी लावून केला पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST2021-09-24T04:26:19+5:302021-09-24T04:26:19+5:30

पोलीस सूत्रांनुसार बागवान नगर येथील शाहरुख रमजान बागवान हे टमटम चालक आहेत. त्यांचे वडील रमजान बागवान फळ विक्रेते आहेत. ...

Pobara snatched Rs 1.5 lakh and locked the hall | दीड लाखाचा मुद्देमाल पळवून चोरट्याने जाताना हॉलला कडी लावून केला पोबारा

दीड लाखाचा मुद्देमाल पळवून चोरट्याने जाताना हॉलला कडी लावून केला पोबारा

पोलीस सूत्रांनुसार बागवान नगर येथील शाहरुख रमजान बागवान हे टमटम चालक आहेत. त्यांचे वडील रमजान बागवान फळ विक्रेते आहेत. एकत्र राहतात. बुधवारी रात्री जेवण करून बागवान कुटुंबीय झोपले होते. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी किचनमधील कपाट उचकटून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी जाताना त्यांच्या हॉलला बाहेरून कडी लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी रमजान बागवान यांना त्यांच्या घराला कोणीतरी बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेजाऱ्याला आवाज दिल्याने त्याने दरवाजा उघडला. त्यानंतर बागवान कुटुंबीयांनी पाहिले असता १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम व ४५ हजार रुपयांचे दागिने असा १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला.

शाहरुख बागवान यांच्या फिर्यादीनुसार घरफोडीचा गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Web Title: Pobara snatched Rs 1.5 lakh and locked the hall