शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात स्प्रिंकलरव्दारे ८० एकरावर केली कांद्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:21 IST

सामूहिक गटशेतीच्या माध्यमातून आले शेतकरी एकत्र

ठळक मुद्दे ८० एकरांवरील कांदा पीक अतिशय जोमातकमी पाण्यावर चांगले पीक घेण्यासाठी कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेतया पिकाची पाहणी कृषी खात्याच्या अधिकाºयांनी केली

सोलापूर: सामूहिक गटशेतीच्या माध्यमातून मार्डीत स्प्रिंकलरच्या माध्यमातून ८० एकरांवर कांदा पीक घेतले असून, या पिकाची पाहणी कृषी खात्याच्या अधिकाºयांनी केली.

शासनाच्या गटशेतीला प्रोत्साहन व सबलीकरण योजनेंतर्गत मार्डी येथील लोकमंगल शेतकरी गटाची निवड करण्यात आली आहे. या गटातील शेतकºयांना १०० एकरांवर कांदा लागवडीचे उद्दिष्ट आहे. यापैकी ८० एकरांवर कांद्याची लागवड केली असून, या सर्व क्षेत्राला स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी दिले जाते. कमी पाण्यावर चांगले पीक घेण्यासाठी कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. या गटाच्या माध्यमातून मार्डीतील शेतकºयांकडून सामूहिक शेततळे, पाईपलाईन, कांदा चाळ, पॅकिंग, प्रोसेसिंग असे कमी खर्चाचे उपक्रम राबविले जाणार आहेत.

 ८० एकरांवरील कांदा पीक अतिशय जोमात असून, अधिकाºयांनी समाधान व्यक्त केले. कोरडवाहू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अमृतसागर, के.व्ही.के.चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, उमेश बिराजदार, दक्षिणचे तालुका कृषी अधिकारी श्रीधर गावंडे, मंडल कृषी अधिकारी दादासाहेब मेलगे, शेतकरी गटाचे काशिनाथ कदम, अंबीर बोंगे, कसीर कुडले, श्रीकांत वैदकर, संतोष तोडकर, राम फसके, कमलाकर माने, विशाल कदम, वासू कदम आदी उपस्थित होते.

सामूहिक शेतीचा प्रयोग: बिराजदारच्प्रत्येक शेतकरी त्या-त्या हंगामात ती-ती पिके घेतो व त्यासाठी आवश्यक खर्च करतोच. मात्र याच शेतकºयांनी एकत्रित सर्व प्रकारचा खर्च केला व अधिक उत्पादनासाठी कृषी अधिकाºयांचे मार्गदर्शन घेतले तर कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येते. गटशेतीच्या माध्यमातून सामूहिक शेतीचा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीonionकांदा