रोटरीच्या वतीने ढवळसमध्ये देशी झाडांचं रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST2021-07-25T04:20:13+5:302021-07-25T04:20:13+5:30
कुर्डूवाडी : रोटरी क्लब ऑफ कुर्डूवाडी, युनियन बँक ऑफ इंडिया व जगदंबा पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यात ...

रोटरीच्या वतीने ढवळसमध्ये देशी झाडांचं रोपण
कुर्डूवाडी : रोटरी क्लब ऑफ कुर्डूवाडी, युनियन बँक ऑफ इंडिया व जगदंबा पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यात ढवळस येथे रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी सुरवसे, सचिव डॉ. सचिन गोडसे, डॉ. रवींद्र बोबडे, जगदंबा पेट्रोलियमच्या अर्चना बोबडे यांच्या हस्ते परिसरात वड, आंबा, गुलमोहरची देशी रोपे लावण्यात आली.
यावेळी चोभेपिंपरीचे सरपंच विक्रम उरमोडे, भोगेवाडीच्या सरपंच राणी गायकवाड, शशिकला गायकवाड, युनियन बँकेच्या मॅनेजर सुहासिनी बोबडे, जगताप, संदीपान गव्हाणे, सरपंच संतोष अनभुले, सेंद्रिय शेती तज्ज्ञ शहा, डॉ. स्वाती बोबडे, डॉ. शुभम बोबडे, पंप व्यवस्थापक खंडू मंगावडे उपस्थित होते. कुर्डूवाडी ब्लड बँकेचे हिंगमिरे, प्रकल्प प्रमुख डॉ. प्रद्युम्न सातव, नागनाथ कुबेर, कॅप्टन अजिनाथ बोबडे, मिलिंद कऱ्हाडे, डॉ.रोहित बोबडे यांनी परिश्रम घेतले.
फोटो : २४ ढवळस ब्लड
ढवळस रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना आमदार संजयमामा शिंदे, रोटरी अध्यक्ष रवी सुरवसे, डॉ. रवींद्र बोबडे, विक्रम उरमोडे, संतोष अनभुले, राणी गायकवाड, डॉ. रोहित बोबडे, नागनाथ कुबेर, डॉ. प्रद्युम्न सातव