वृक्ष बँकेच्या माध्यमातून १०० झाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:48+5:302021-02-05T06:47:48+5:30

एखतपूर रोड ते क्रीडा संकुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा बॉटल पामच्या १०० रोपांचे वृक्षारोपण केले. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस सांगोला ...

Planting of 100 trees through tree bank | वृक्ष बँकेच्या माध्यमातून १०० झाडांची लागवड

वृक्ष बँकेच्या माध्यमातून १०० झाडांची लागवड

एखतपूर रोड ते क्रीडा संकुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा बॉटल पामच्या १०० रोपांचे वृक्षारोपण केले. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस सांगोला नगर परिषद मुख्याधिकारी निवास, सांगोला न्यायालय, इदगाह मैदान, वन विभागाचे कार्यालय आहे. या बॉटल पाम प्रकारच्या वृक्ष लागवडीने पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर या परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.

यावेळी नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, कार्यालयीन अधिक्षक अभिलाषा निंबाळकर, आरोग्य सभापती रफिकभाई तांबोळी, पाणीपुरवठा सभापती शोभा घोंगडे, बांधकाम सभापती अप्सरा ठोकळे, नगरसेविका स्वाती मगर, छाया मेटकरी, नगरसेवक आस्मिर तांबोळी, गजानन बनकर, सुरेश माळी, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, अरोग्य निरीक्षक संजय दौंडे यांच्यासह नगर परिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हरित सांगोला शहर करण्याचा मानस

सांगोला वृक्ष बँकेत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर झाडांची रोपे व संरक्षण जाळ्या प्राप्त होत आहेत. या रोपांची लागवड योग्य नियोजन करून शहरात विविध ठिकाणी केली जात आहे. येत्या काळात माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरास हरित सांगोला करण्याचा मानस असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

कोट ::::::::::::::::::::

प्रजासत्ताक दिनी वृक्षारोपण करून नगर परिषदेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. या ठिकाणच्या रोपांच्या लागवडीने पर्यावरण संरक्षण याबरोबरच या परिसराच्या सौंदर्यात मोठी भर पडेल.

- राणी माने,

नगराध्यक्षा

Web Title: Planting of 100 trees through tree bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.