शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नियोजनबद्ध शेती; गतवर्षी पेटविलेल्या तुरीचे यंदा घेतले विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:33 IST

सोलापूर : तुरीच्या काढणीचा खर्च परवडत नाही म्हणून गतवर्षी तुरीच्या उभ्या पिकाला पेटवून देणाºया अक्कलकोट तालुक्यातील बासलेगांव येथील शेतकºयाने ...

ठळक मुद्देकर्नाटकात जास्त दर मिळतो म्हणून केले धाडस२१ एकरांत २१० क्विंटल तुरीचे उत्पादन झाले राज्यात ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी केली जाते तर कर्नाटकात ६१०० रुपये दर

सोलापूर : तुरीच्या काढणीचा खर्च परवडत नाही म्हणून गतवर्षी तुरीच्या उभ्या पिकाला पेटवून देणाºया अक्कलकोट तालुक्यातील बासलेगांव येथील शेतकºयाने यंदा धाडस करून २१ एकरात २१० क्विंटल इतके तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कर्नाटकात तुरीला महाराष्टÑापेक्षा जास्त प्रती क्विंटल ६१०० हमीभाव असल्याने या शेतकºयाने पुन्हा तूर पिकविण्याचे धाडस केले आहे.

गतवर्षी पाऊसमान चांगला असल्याने राज्यात तुरीचे बंपर उत्पादन झाले होते़ त्यामुळे तुरीचा बाजारभाव अतिशय कमी झाला होता़ राज्य सरकारने शेतकºयांच्या मागणीमुळे राज्यात ठिकठिकाणी तूर खरेदीची केंद्रे सुरू केली होती़ तुरीला प्रति क्विंटल ४५०० रुपये हमीभाव जाहीर केला होता, तरीही व्यापाºयांनी ३ हजार ते ३ हजार ३०० रुपये क्विंटल दराने तुरीची खरेदी सुरू केली़ राज्यभर या प्रकाराचा शेतकºयांनी निषेध नोंदवला़ अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी दहा एकरांवर तुरीचे पीक घेतले होते़ तुरीच्या काढणीचा खर्च आणि तुरीचा बाजारातील दर यांचा ताळमेळ बसत नसल्याने बिराजदार यांनी दहा एकर क्षेत्रातील तुरीचे उभे पीक पेटवून दिले आणि शासनाचा निषेध नोंदवला होता.

यंदा शशिकांत बिराजदार यांनी पुन्हा दहा एकर क्षेत्रात तुरीचे पीक घेतले़ २४ जून रोजी पिंकू या वाणाची टोकन पद्धतीने लावण केली़ जून-जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण बºयापैकी होत़े़ त्यामुळे तुरीचे पीक जोमदार आले़ आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिली़ त्यामुळे बिराजदार यांनी एक पाण्याची पाळी दिली़ मजुरांचा प्रश्न गंभीर असल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने दोन वेळा कुळव मारले़ कीड व्यवस्थापनासाठी तीन वेळा कीटकनाशकाची फवारणी केली़ वातावरण आणि हवामान उत्तम असल्याने तुरीची चांगली वाढ झाली़ नुकतीच या तुरीची हार्वेस्टरच्या साह्याने काढणी करण्यात आली आहे.

२१ एकरांत २१० क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे़ महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्रे  सुरू करण्यात आली आहेत़ तरीही व्यापारी शेतकºयांकडून अतिशय कमी दराने तुरीची खरेदी करीत आहेत़ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झालेला हमीभाव केंद्रात आजही तुरीचे दर कमीच आहेत. राज्यात ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी केली जाते तर कर्नाटकात ६१०० रुपये दर आहे़ एका खातेदाराच्या नावे २० क्विंटल तूर खरेदी केली जाते. त्यामुळे सीमावर्ती भागातील अक्कलकोट-दक्षिण सोलापूर तालुक्यातून अनेक शेतकरी आपली तूर कर्नाटकात विक्रीसाठी पाठवत आहेत़ नातलगांच्या नावे या तुरीची विक्री करण्यात येत आहे़

लक्ष वेधले; पण पणन विभागाने दुर्लक्ष केले!महाराष्ट्र आणि कर्नाटकात हमी  भाव केंद्रात खरेदी केल्या जाणाºया तुरीचे दर वेगवेगळे असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत़ शशिकांत बिराजदार यांनी याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला़ परंतु अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने आणि पणन विभागाने त्यांना बेदखल केले़ त्यामुळेच ही तूर कर्नाटकाच्या केंद्रात विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड