शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे...; मुंबईतल्या गवंडी, सुतार, दागिने कारागिरांची सोलापुरातून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 15:35 IST

विजयपूर, आलमट्टीला पोहोचण्यासाठी संघर्ष; अनेक वाहनांना हात केला, मात्र कुणी थांबले नाही

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे खासगी वाहनांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहेजे मजूर चालत येतात ते या वाहनांना थांबण्याची विनंती करतातमुंबईवरुन जाणारी ही वाहने थांबल्यानंतर पुणे किंवा सोलापुरात येतात

सोलापूर : शहरातून जाणारा विजयपूर रोड हा कर्नाटकाला जाऊन मिळतो. नेहमीच गाड्यांची वर्दळ असणाºया या रोडवर आता मोजकी काही वाहने तर पायपीट करणारे मजूर जाताना दिसत आहेत़ मुंबई-पुणे येथून सोलापुरात आल्यानंतर पुन्हा पायी जात आपले घर गाठण्यासाठी संघर्ष करत आहेत. यात सुतारकाम, गवंडीकाम तसेच दागिने कारागिरांचा समावेश आहे.

सध्या विजयपूर रोडवरुन अनेक मजूर चालत जाताना पाहायला मिळत आहेत़ यातील बहुतांश मजूर हे कर्नाटकातील असून, मुंबई व पुणे येथे काम करत होते. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने घराचे भाडे व खाण्याचा खर्च भागवू शकत नसल्याने त्यांच्यावर पायपीट करण्याची वेळ आली आहे. काही मजूर हे मुंबई-पुणे, पुणे -सोलापूर असा प्रवास मिळेल त्या वाहनांनी केला. बहुतांश गाड्या या कोरोनाच्या भीतीमुळे थांबत नाहीत. मग, पुन्हा पायपीट सुरुच करावी लागते. तर काही वाहने ही चेकपोस्टच्या अलीकडे थांबत मजुरांना इथून पुढे चालत जाण्याचा सल्ला देत आहेत.सोलापुरात आल्यानंतर पुन्हा पायपीट करावी लागत आहे. अनेक वाहनांना हात केला, मात्र कुणी थांबले नाही. 

विजयपूर येथे जाणाºया एका कुटुंबामधील लहानग्यांच्या पायात चप्पलही नव्हती. तर आलमट्टी येथे पायी जाणाºया कुटुंबीयांचे जेवण संपले होते. वडकबाळ येथे जाऊन गावकºयांकडून जेवण मागून खाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई ते सोलापूर प्रत्येक व्यक्ती दोन हजार रुपये- लॉकडाऊनमुळे खासगी वाहनांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर काही मोजक्या वाहनांना शासनाने परवानगी दिली आहे. जे मजूर चालत येतात ते या वाहनांना थांबण्याची विनंती करतात. मुंबईवरुन जाणारी ही वाहने थांबल्यानंतर पुणे किंवा सोलापुरात येतात. मुंबईवरुन सोलापुरात यायला प्रत्येकाला सुमारे दोन हजार रुपये घेतले जात आहे. रेल्वेने कमी तिकिटात जाण्याची वेळ आता नसल्याने प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन प्रवास करत असल्याचे एका मजुराने सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई