पिंपरी हिंगणीत वाळू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:21 IST2021-02-14T04:21:42+5:302021-02-14T04:21:42+5:30

वैराग : भोगावती नदीपात्रातून वाळू उपसा करुन निघालेले वाहन वैराग पोलिसांच्या पथकाने पिंपरी हिंगणी (ता. बार्शी) रस्त्यावर पकडून दोघांविरोधात ...

Pimpri Hingani caught the sand | पिंपरी हिंगणीत वाळू पकडली

पिंपरी हिंगणीत वाळू पकडली

वैराग : भोगावती नदीपात्रातून वाळू उपसा करुन निघालेले वाहन वैराग पोलिसांच्या पथकाने पिंपरी हिंगणी (ता. बार्शी) रस्त्यावर पकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार वैराग पोलिसांचे एक पथक शुक्रवारी मध्यरात्री २ वाजेच्या दरम्यान हिंगणी रोडवरील दत्त चौकातून गस्त घालीत निघालेले होते. या परिसरातून नदीपात्रातून उचलेली वाळू चोरुन नेली जात असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली. दरम्यान दोन व्यक्ती एका टेम्पोमध्ये वाळू घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. वाळूने भरलेल्या टेम्पोसह संदीप दिगंबर पाखरे (वय २८ रा. मानेगाव) आणि हनुमंत भागवत देवकर (वय ४४ ) या दोघांना तेथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत पोलीस काँन्टेबल सचिन मुंढे यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे.

Web Title: Pimpri Hingani caught the sand