सोलापूर : कुर्डू (ता. माढा) येथे सुरू असलेला मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. येथे डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. बेकायदा उत्खनन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आधीच दिल्या असून, सविस्तर अहवाल तहसीलदारांना सादर करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी सोमवारी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोन प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाने स्पष्ट केले की, संबंधित काम बेकायदेशीर आहे.त्यामुळे कारवाई थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपसा व मुरुम उत्खननाबाबत आढावा घेतला.
बेकायदेशीर उपसा चालू असल्यास तत्काळ कारवाई करावी व ती कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी व्हिसीद्वारे दिल्या.