शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मतदानावेळी नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडेच असल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:22 IST

मोहोळ विधानसभा मतदारसंघ : टक्का घटला तरी २० हजारांनी मतदान वाढले

ठळक मुद्देअनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झालेया निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला

अशोक कांबळे 

मोहोळ : होणार होणार म्हणून बहुचर्चित विधानसभेची निवडणूक यंदा एकदाची संपलीही.  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळविधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झाले असले तरी सन २०१९ मध्ये मतदानाचा आकडा २० हजाराने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. 

सन २०१४ मध्ये २ लाख ८० हजार ३७७ मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ५३६ इतके मतदान झाले होते. त्याची टक्केवारी ६६.८६ इतकी होती. तर नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ६५.६२ टक्के इतकी नोंदविली गेली आहे. गत निवडणुकीपेक्षा १ टक्का मतदान जरी कमी दिसत असले तरी २० हजार ४५८ मतदान या निवडणुकीत वाढले आहे.

मतदारसंघात शहरासह तालुक्यात रविवारी रात्रीपासूनच पाऊस सुरु होता. त्यामुळे सकाळच्या पहिल्या दोन तासात मतदारांची गैरसोय झाली, परंतु सकाळी ११ नंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. 

मतदारसंघातील कोळेगाव, कुरुल, सावळेश्वर, खुनेश्वर, अर्जुनसोंड, आष्टी या ६ ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या, परंतु सहायक निवडणूक अधिकारी जीवन बनसोडे व निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी तातडीने मशीन बदलून मतदान सुरळीत पार पडले. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.

निवडणूक  प्रचारात तालुक्याच्या स्थानिक राजकारणातील एकमेकांची गटबाजी, एकमेकांच्या गटबाजीतून मतांची कशी होईल विभागणी, एकमेकांचे पाठिंबे यावरून एकमेकांची उणीदुणी काढण्यातच सर्वांनी धन्यता मानल्याचे चित्र प्रचारात दिसून आले. या निवडणूक प्रचारात नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असे चित्र निर्माण झाल्याने सुज्ञ मतदार व नवीन वाढलेल्या युवा मतदारांनी नेमका काय निर्णय घेतलाय हे २४ तारखेला मतमोजणीनंतरच समजणार आहे.

ठोस मुद्यांची वानवा- मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत वंचित राहिल्याचे दिसत आहे.आजही  ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, आष्टी उपसा सिंचन योजना, पोखरापूर तलावात पाणी सोडणे, शिरापूर उपसा सिंचन योजना, ५० वर्षांपासून रखडलेला मोहोळ शहराच्या कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, याबाबतचा ठोस अजेंडा घेऊन कोणीच प्रचारात उतरलेले दिसून आले नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरmohol-acमोहोळvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण