विष पिऊन आत्महत्या करेन असा फोन... मोबाईल लोकेशनमुळे वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST2021-03-04T04:40:54+5:302021-03-04T04:40:54+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय सुदाम गुरव (वय २७, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) याने घरगुती वादावरून मी विष पिऊन ...

Phone that will commit suicide by drinking poison ... Life saved due to mobile location | विष पिऊन आत्महत्या करेन असा फोन... मोबाईल लोकेशनमुळे वाचवले प्राण

विष पिऊन आत्महत्या करेन असा फोन... मोबाईल लोकेशनमुळे वाचवले प्राण

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय सुदाम गुरव (वय २७, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) याने घरगुती वादावरून मी विष पिऊन आत्महत्या करत आहे असे नातलगांना मोबाईलवरून सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो फोन कोणाचाच घेत नव्हता.

यामुळे दत्तात्रय पांडुरंग गुरव यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना संबंधित प्रकार सांगितला. त्यानंतर अवचर यांनी तत्काळ सोलापूर ग्रामीणचे सायबर सेलचे पोलीस अत्तार यांना संजय गुरव यांचा फोन नंबर देऊन लोकेशन घेण्यास सांगितले. अत्तार यांनी काही मिनिटात संजय गुरवचे लोकेशन प्राप्त करून दिले. लोकेशनवरून गोपाळपूर स्मशानभूमी येथे असल्याचे कळाले. त्याठिकाणी त्याचे नातलग पोहोचले, तर संजय गुरव हा विषाची बाटली घेऊन पिण्याच्या तयारीत असताना मिळून आला. पोलिसांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवण्यात गुरवाच्या नातेवाइकांना यश मिळाले आहे. यामुळे नातेवाइकांनी पोलीस प्रशासनाने आभार व्यक्त केले.

फोटो : विष पिऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेले संजय सुदाम गुरव.

===Photopath===

020321\img-20210302-wa0027.jpg

===Caption===

फोटो : विष पिऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेले संजय सुदाम गुरव.

Web Title: Phone that will commit suicide by drinking poison ... Life saved due to mobile location