शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्यांची किमया;चक्क १२ महिन्यात ७ टन पेरूने मिळाले ३ लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:49 IST

नाही मात्रा रासायनिक खतांची...;६० गुंठ्यांत ७ टन पेरुला गोडी सेंद्रियाची

ठळक मुद्देफळं पुणे बाजारपेठेत; देगाव (वा़) येथील लामगुंडे दाम्पत्याची यशोगाथा६० गुंठे क्षेत्रावर १५ बाय १५ अंतरावर एकूण ४०० रोपांची लागवड आजपर्यंत एकूण ७ टन फळांची विक्री केली, सरासरी दर ४० रुपये किलो मिळाला

संभाजी मोटेवाळूज : वडिलोपार्जित ४० एकर शेती़़़पारंपरिक पिके घेऊनही गुजराण सुरु होती..वैद्यकीय सेवेतून मिळणाºया वेळेतून ६० गुंठ्यांवर पेरुची लागवड केली. क़ाटेकोर नियोजनाला प्रयोगाची जोड दिली. चक्क १२ महिन्यांत ७ टन सेंद्रिय पेरुचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या एका दाम्पत्याने.

डॉ़ मिलिंद लामगुंडे आणि डी फार्मसी झालेली त्यांची पत्नी प्रमिला लामगुंडे असे त्या दाम्पत्याचे नाव़ देगाव (वा.) येथील या दाम्पत्याने आपला वैद्यकीय व्यवसाय करत ६० गुंठे क्षेत्रात पेरूची लागवड करून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.

मिलिंद यांचे वडील हेही डॉक्टर होते. वडिलांच्या पारंपरिक शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा विचार या दाम्पत्याच्या मनात आला़ सर्वप्रथम त्यांनी ६० गुंठ्यांत मशागत करून जमीन चांगली करुन घेतली़ गवत काढून बाग स्वच्छ केली. त्या ६० गुंठे क्षेत्रावर १५ बाय १५ अंतरावर एकूण ४०० रोपांची लागवड केली. प्रयोगाच्या माध्यमातून सरदार पेरूची लागवड केली.

तत्पूर्वी भरपूर प्रमाणात शेणखत वापरले. ठिबक सिंचनाव्दारे पाणीपुरवठा केला. झाडांवर कुठलीही कीटकनाशक फवारणी केली नाही अथवा कुठलेही रासायनिक खत बागेला वापरले नाही. म्हणून सेंद्रिय पेरू म्हणण्यास हरकत नाही.

प्रत्यक्षात आॅक्टोबर महिन्यात पेरू तोडणीला सुरुवात झाली. आजपर्यंत एकूण ७ टन फळांची विक्री केली. सरासरी दर ४० रुपये किलो मिळाला़ ही फळं पुणे आणि सोलापूर येथील बाजार समितीला पाठविली. या लागवडीवर एकूण ३० हजार खर्च झाला. खर्च वजा करता २़५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

व्यस्त जीवनातही शेतीला प्राधान्य - डॉ़ लामगुंडे दाम्पत्याने देगाव येथे मागील १५ वर्षांपासून रुग्णांची सेवा करतात. सकाळी ९ ते १२ या वेळेत देगाव येथे तर दुपारी १ ते ५ दरम्यान मोहोळ येथे दवाखाना चालवितात. तर प्रमिला या गावातच औषध दुकान चालवितात. दोघेही आपला व्यवसाय करत शेती करतात़ वैद्यकीय क्षेत्रातले दोघेही सकाळी सहा ते आठ या वेळेत शेतामध्ये काम करतात. दुपारी तीन ते सहादरम्यान शेतात काम करतात.

वडीलही पेशाने डॉक्टर असले तरी ते खरे शेतकरी होते़ शेतीचे बाळकडू त्यांच्याकडून मिळाले. एकूण ४० एकरांत वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करीत राहिलो. पती आणि कुटुंबाच्या मदतीने ६० गुंठ्यांत ७ टन पेरुचे उत्पादन घेता आले ते केवळ प्रयोगशील कृतीमुळे़ या प्रयोगाच्या माध्यमातूनच सर्व पिके सेंद्रिय पध्दतीने घ्यावीत़ त्याला दरही चांगला मिळतो़ सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. - प्रमिला लामगुंडे, पेरु उत्पादक, देगाव (वा़)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdocterडॉक्टरHealthआरोग्य