सोलापूरच्या सचिन खरातने साकारले स्व़ ज्योत्स्ना दर्डांचे व्यक्तीचित्र

By Admin | Updated: March 20, 2017 20:17 IST2017-03-20T20:17:49+5:302017-03-20T20:17:49+5:30

सोलापूरच्या सचिन खरातने साकारले स्व़ ज्योत्स्ना दर्डांचे व्यक्तीचित्र

The personality of Swat Jyotsna Dard, created by Sachin Kharat, of Solapur | सोलापूरच्या सचिन खरातने साकारले स्व़ ज्योत्स्ना दर्डांचे व्यक्तीचित्र

सोलापूरच्या सचिन खरातने साकारले स्व़ ज्योत्स्ना दर्डांचे व्यक्तीचित्र

सोलापूरच्या सचिन खरातने साकारले स्व़ ज्योत्स्ना दर्डांचे व्यक्तीचित्र

लोकमत वुमन्स समिट : विजय दर्डा यांना दिले भेट

पुणे : लोकमत सखी मंचच्या संस्थापिका स्व़ ज्योत्स्ना दर्डा यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव, डोळ्यातील ममता आणि आश्वासकता हे सारे सोलापूरचा युवा चित्रकार सचिन खरात याने साकारलेल्या व्यक्तीचित्रामध्ये हुबेहूब पाहायला मिळाले़ सचिनने हे चित्र लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना भेट दिले़
लोकमत माध्यम समूहाने आयोजिलेल्या लोकमत वुमेन समिटचे भव्यदिव्य उद्घाटन पुणे येथे झाले़ यावेळी हे व्यक्तीचित्र भेट देण्यात आले़ याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, निर्माता, दिग्दर्शक महेश भट, दिव्या दत्ता, सुनील ग्रोवर, युनिसेफच्या अ‍ॅडव्होकसी व कम्युनिकेशनप्रमुख अलेक्झांड्रा वेस्टरबिक राजेश्वरी चंद्रशेखर, कुस्तीपटू गीता फोगट, व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख देविता सराफ, प्रीती भाटकर, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, सानिया सेठ, हिता अजमेरा, राजकीय समालोचक नीरजा चौधरी, जान्हवी धैर्यवाल, देविदास सराफ आदी मान्यवर उपस्थित होते़ या कार्यक्रमात सचिन खरात याच्या कुंचल्याची जादू पाहायला मिळाली़ दर्डा यांनी सचिनच्या व्यक्तीचित्राचे कौतुक केले़ सचिन खरात यांच्या चित्रकलेचा विषय भारतीय परंपरा आणि संस्कृती हा आहे़ या चित्राबाबत बोलताना स्व़ ज्योस्त्ना दर्डा यांच्या चेहऱ्यांवरील भारतीय स्त्रीत्वाचे भाव, अतिशय भावल्यामुळे आपण त्यांचे व्यक्तीचित्रण केल्याचे सचिन खरात यांनी सांगितले़
फोटो- २० ज्योत्स्ना भाभी

Web Title: The personality of Swat Jyotsna Dard, created by Sachin Kharat, of Solapur