चक्कर आली निमित्त झालं अन् त्या बिचाऱ्याचा कायमचा श्वास हरपला
By रवींद्र देशमुख | Updated: October 28, 2023 15:29 IST2023-10-28T15:29:27+5:302023-10-28T15:29:35+5:30
या घटनेतील गिरनाथ हे शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास घरी असताना, त्यांना अचानक चक्कर आली.

चक्कर आली निमित्त झालं अन् त्या बिचाऱ्याचा कायमचा श्वास हरपला
सोलापूर : घरी असलेले असताना अचानक त्यांना चक्कर आल्याचं निमित्त झालं. ते खाली कोसळले आणि शुद्ध हरपली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गिरनाथ धरेप्पा वाघमारे (वय- ५६, हरळय्या नगर, सोलापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारस ही घटना घडली.
या घटनेतील गिरनाथ हे शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास घरी असताना, त्यांना अचानक चक्कर आली. तोल सावरण्यापूर्वीच त्यात ते खाली पडले. यात त्यांची शुध्द हरपली. त्याच अवस्थेत त्यावंना रात्री १० वाजता भाऊ नंदकुमार यांनी उपचारास दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.