शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

चुरस असली तरी मतदानाची टक्केवारी ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:16 IST

बार्शी विधानसभा मतदारसंघ; तिन्ही उमेदवारांनी करून घेतले मतदान

ठळक मुद्देमतदान झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत गावागावात व चौकाचौकात घोळक्याद्वारे चर्चा सुरूग्रामीण भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर ६० ते ८८ टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागात ५७ ते ७५ टक्के मतदान झालेमतदानाचा टक्का मागील वेळेप्रमाणे कायम असला तरी  वाढलेले दहा हजार मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : विधानसभा निवडणुकीत बार्शीविधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांपूर्वी झाले एवढेच म्हणजे ७२ टक्के मतदान झाले आहे़ मतदान प्रक्रिया ही सुरळीतपणे मात्र थोडीशी संथगतीने झाली असली तरी तालुक्यात महायुती, अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही उमेदवारांनी चुरशीने मतदान करून घेतले आहे़ यंदा तालुक्यात कुठेही भांडण-तंटे किंवा अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष़ बार्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दिलीप सोपल, अपक्ष राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर यांच्याशिवाय इतर ११ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

तालुक्याच्या राजकारणात सोपल व राऊत हे दोन गट प्रबळ आहेत़ त्यात यंदा प्रथमच वैराग भागातील असलेले निरंजन भूमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब अजमावत आहेत़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील ७२ टक्के मतदान होते़ यंदा देखील ७२़३९ टक्केच मतदान झाले आहे़ केवळ मतदान वाढलेले असल्यामुळे आकड्याच्या खेळात दहा हजार मतदान हे जास्त झाले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत असलेल्या दिलीप सोपल यांनी पक्ष बदलत शिवसेनेत प्रवेश केला व महायुतीची उमेदवारी मिळवली़ त्यामुळे भाजपमध्ये असलेले राजेंद्र राऊत यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून निवडणूक लढवली़ राष्ट्रवादीत असलेल्या निरंजन भूमकर यांनी सोपल यांच्या पाठीमागे न जाता राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन प्रथमच वैराग भागातील उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक यंदा सर्वार्थाने वेगळी अशी आहे.

मतदानाचा टक्का मागील वेळेप्रमाणे कायम असला तरी  वाढलेले दहा हजार मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

तालुक्यात सर्वाधिक नव्वद  टक्के मतदान हे गाताचीवाडी या गावात झाले तर सर्वात कमी मतदान ५७ टक्के हे शहरातील १३० नंबर केंद्रावर झाले़ ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर ६० ते ८८ टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागात ५७ ते ७५ टक्के मतदान झाले आहे.

५० हजारांपर्यंत लागल्या पैजा- मतदान झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत गावागावात व चौकाचौकात घोळक्याद्वारे चर्चा सुरू असून, आमच्या गावात बाण चालला बघा़़़ अन् तुमच्या गावात ट्रॅक्टरची लय हवा होती, असं ऐकायला आलंय ते खरं हाय का अशा आशयाचे संवाद बोलले जात आहेत़ अनेक ठिकाणी शंभर रुपयांपासून दहा ते पन्नास हजारांपर्यंत पैजा देखील लागल्या आहेत़ 

८२२ दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्कतालुक्यात असलेल्या पुरुष १,५९,६५९ पैकी १,१७,००९ यांनी तर महिला १,४६,२४० पैकी १,०४,४३४ आणि ११ पैकी ६ इतर असे एकूण ३,०५,९२० पैकी २,२१,४५२ मतदारांनी मतदान केले़ यामध्ये ११६१ दिव्यांगांपैकी ८२२ दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला़ 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपलbarshi-acबार्शी