शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मिरचीला भाव मिळाला नाही अन् खरबूज विक्रीअभावी जागेवर सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:28 IST

कोरोनाचं संकट; रानमसलेच्या वसंत पाटील या शेतकºयाची व्यथा

ठळक मुद्देमोजक्या शेतकºयांना शेती उत्पादनातून चांगला पैसा मिळतोअपेक्षित उत्पादन न आल्याने व मालाला अपेक्षित भाव मिळत नाहीयावर्षी तर कोरोनामुळे संपूर्ण शेती नुकसानीत आहे

अरुण बारसकर

सोलापूर : अद्ययावत शेतीतून चांगले उत्पादन घेण्यासाठी मल्चिंग व ठिबकच्या सहाय्याने ढोबळी मिरची व खरबुजाचे पीक घेतले. मिरचीला दर मिळाला नाही व खरबूज कोरोनामुळे जागेवरच सडले. ही व्यथा आहे रानमसले येथील वसंत रामा पाटील यांची.

उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावालगत वसंत पाटील यांची चार एकर शेती. पत्नी, दोन मुले व सुना शेतातच राबतात. मुलगा सचिन व संतोष यांनी एक एकर ढोबळी सिमला मिरची केली. त्यासाठी रान तयार केले, त्यावर मल्चिंग कागद टाकला. नव्याने ठिबक केले व मिरची लावली. चांगली मिरची येण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे खते दिली. शिवाय आवश्यक तेवढ्या फवारण्याही केल्या. 

मिरचीचे पीक जोमात आणले. आता चांगला पैसा होईल असे वाटत असतानाच मिरचीला दरच मिळाला नाही. तोडणीचा खर्चही मिरचीच्या विक्रीतून होत नसल्याने तोडणीच बंद केली. मिरचीसाठी मल्चिंग, ठिबक, खते व रोपांसाठी साधारण  तीन लाख रुपये खर्च झाल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.

अशीच स्थिती खरबुजाचीही झाली. रान तयार करुन मल्चिंग व ठिबकसाठी खर्च करुन पावणेदोन एकरात ११ हजार खरबुजाची रोपे लावली. आवश्यक खते, फवारण्या केल्याने दर्जेदार खरबूज आले. अशी विक्री सुरू होणार इतक्यात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली. बाजारात विक्रीसाठी घेऊन जाता येईना व सभोवतालच्या गावात विक्रीसाठी गेल्यावर गावकºयांकडून वाहनाची अडवणूक झाली. पोलीसही वाहने अडवू लागले. त्यामुळे खरबूज जागेवरच सडले. खरबूज पीक घेण्यासाठी दोन-अडीच लाख रुपये खर्च झाला; मात्र थोड्याफार विक्रीतून ५० हजार रुपये मिळाल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.

खर्चही निघाला नाही- सलग तीन वर्षे वेगवेगळ्या पिकांसाठी  आठ ते दहा लाख रुपये खर्च केला; मात्र केलेला खर्चही उत्पादन विक्रीतून निघाला नाही. एकतर पाण्याची अडचण त्यातून तुटपुंज्या पाण्यावर आणलेल्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे अडचणीत आलो, असल्याची व्यथा रानमसलेचे शेतकरी वसंत पाटील यांनी व्यक्त केली. 

मोजक्या शेतकºयांना शेती उत्पादनातून चांगला पैसा मिळतो; मात्र बहुतांश शेतकरी खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न आल्याने व मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. यावर्षी तर कोरोनामुळे संपूर्ण शेती नुकसानीत आहे.- प्रभाकर देशमुख, जनहित शेतकरी संघटना

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेतीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार