शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महिलेच्या अंत्यविधीस लोक जमले, पॉझिटिव्ह रिपोर्ट येताच अख्खी बस भरून ‘क्वारंटाईन’ झाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:53 IST

धक्कादायक प्रकार : सोलापुरातील खासगी रुग्णालयाकडून घडलेली चूक नागरिकांच्या आली जीवाशी

ठळक मुद्देसिव्हिल हॉस्पिटल आणि महापालिका आरोग्य खात्यात समन्वय नसल्याचे वारंवार दिसते क्वारंटाईन सेंटर, आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट दोन दिवसांनंतरही येत नसल्याच्या अनेक तक्रारी निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे सांगितल्यामुळे हे रुग्ण घरातील अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात

सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वॅब टेस्ट रिपोर्टचा घोळ चर्चेत असताना आता खासगी रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्णिक नगर येथील एका ७५ वर्षीय महिलेचे बुधवारी निधन झाले. १०० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधीनंतर ही महिला कोरोनाबाधित असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांसह अंत्यविधीला गेलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले.

कर्णिक नगर येथील ७५ वर्षीय महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. प्रकृती बिघडल्यामुळे कुटुंबीयांनी १६ मे रोजी सिद्धदेश्वर पेठेतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी स्वाईन फ्लूसह इतर चाचण्या केल्या. स्वॅब टेस्टही घेण्यात आली. उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी तीन वाजता या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला याची कल्पना देऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी स्वॅब टेस्टचा रिपोर्ट आला. त्यात या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णालयाने एकूण १२ जणांचे स्वॅब सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवले होते. त्यात केवळ या महिलेची टेस्ट पॉझिटिव्ह आली.

या महिलेच्या अंत्यविधीला परिसरातील काही नागरिक गेले होते. गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून आलेले अहवाल जाहीर केले. यात या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य खाते कर्णिक नगर परिसरात दाखल झाले. या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना आणि अंत्यविधीला गेलेल्या नागरिकांना केगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.सिद्धेश्वर पेठेतील या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे संपर्क केला असता त्यांनी स्वॅब टेस्टचा रिपोर्ट ३२ तासांनंतर आला. त्यामुळे हा घोळ झाल्याचे सांगितले. 

स्वॅब रिपोर्टचा घोळ- सिव्हिल हॉस्पिटल आणि महापालिका आरोग्य खात्यात समन्वय नसल्याचे वारंवार दिसते. क्वारंटाईन सेंटर, आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट दोन दिवसांनंतरही येत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. एखाद्या रुग्णाला निगेटिव्ह असल्याचे सांगून घरी पाठवले जाते. त्यानंतर काही तासातच त्याला तुम्ही पॉझिटिव्ह आहात म्हणून सांगितले जाते. निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे सांगितल्यामुळे हे रुग्ण घरातील अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. बाहेर फिरून येतात. हा सर्व प्रकार नागरिकांच्या जीवाशी येणार असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी यापूर्वी केल्या आहेत.

आरोग्य अधिकाºयांना पत्ताच नाही- महापालकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता लोकमतच्या प्रतिनिधीने फोन केला. कर्णिक नगर येथील प्रकरणाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, स्वॅब टेस्टचे रिपोर्ट आल्याशिवाय कोणताही मृतदेह ताब्यात देता येत नाही. कोणीही असे करू शकत नाही. परंतु, कर्णिक नगर येथे काय घडलंय, याबद्दल मला माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो. दरम्यान, शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, कोरोनाबाधित रुग्ण, या रुग्णांच्या संपर्कातील लोकांबद्दलची माहिती इत्थंभूत माहिती ठेवण्याची जबाबदारी आरोग्य अधिकाºयांवर आहे. परंतु, शहरातील अनेक प्रकरणांबाबत आरोग्य अधिकाºयांना माहितीच नसल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. कर्णिक नगर प्रकरणात असेच दिसून आले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस