शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

पाणी न दिल्यास लोक जोड्याने मारतील; आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:55 IST

अक्कलकोट तालुका टंचाई आढावा बैठक

ठळक मुद्देप्रत्येकाने शिवारात पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी योजना राबवावीअक्कलकोट तालुक्याची दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरूदुष्काळावर मात करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन आ. म्हेत्रे यांनी केले

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्याची दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. दुष्काळीप्रसंगी पाणी न दिल्यास लोक जोड्याने मारतील अशी भीती आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली.

 अक्कलकोट तालुका टंचाई आढावा बैठकीत म्हेत्रे बोलत होते. यावेळी तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, पंचायत समिती सभापती सुरेखा काटगाव, गटविकास अधिकारी कोळी, उपसभापती प्रकाश हिप्परगी, महादेव बेळ्ळे, राजेंद्र बंदीछोडे, के. पी. पिरजादे, गुंडप्पा पोमाजी,तालुका कृषी अधिकारी राम फडतरे, प्रदीप जगताप, प्रदीप पाटील,अरुण जाधव,तालुका कृषी अधिकारी राम फडतरे,तलाठी संघटना अध्यक्ष ए पी पाटील,  नूरधीन मुजावर, रमेश भासगी, निगप्पा कोळी यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

प्रत्येकाने शिवारात पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी योजना राबवावी. त्यासाठी प्रत्येकाने जिद्दीने कामाला लागावे. राजकारण बाजूला सारून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन आ. म्हेत्रे यांनी केले.उपाध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले, नाविंदगी, नागणसूर, शावळ, गौडगाव (बु.) या गावांनी वीज बिल न भरल्यामुळे शावळ येथे असलेले पंपहाऊस बंद आहे. पन्नास टक्के बिल जिल्हा परिषद भरण्यास तयार आहे, त्याचा प्रस्ताव द्यावा. सोलारवर हातपंपमधून पाणी उपसा वीज बिल भरावे लागणार नाही, त्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव देण्याचे आवाहन केले.

तहसीलदार अंजली मरोड यांनी दुष्काळामुळे घाबरून न जाता नामी संधी समजून प्रत्येक गावातील विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, सरळीकरण यासारखी कामे करावीत, असे आवाहन केले.

टँकरपेक्षा इतर स्त्रोत शोधा- गळोरगी, भोसगे, बोरेगाव, चपळगाववाडी, बावकरवाडी, शेगाव, गोगाव,उमरगे या गावांत पाणीटंचाई भासणार नसल्याचे संबंधितांनी सांगितले. हिळ्ळीत पाणी मुबलक असले तरी ते पिण्यालायक नाही. हालहळ्ळी (ह.)येथील कोणीच उपस्थित नव्हते. हातपंप दुरुस्तीसाठी कर्मचारी नाहीत, ते मानधनावर घ्यावेत, असे ठरले. एबीसीडी या कोडवर्डबाबत पाणीपुरवठा अधिकाºयांना सांगता आले नाही. ५०० फुटांच्या आत असणाºया विहीर, बोअरमधून विनामानधन पाणी घेण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. टँकरपेक्षा इतर स्त्रोत शोधा, असे तहसीलदार म्हणाल्या. सर्वच गावांत डिसेंबरअखेर पाणीटंचाई भासणार असल्याचे सांगण्यात आले.

म्हेत्रे भडकले- बैठक चालू असताना काही कर्मचारी गप्पा मारण्यात,मोबाईल चॅटिंग करण्यात मग्न होते. तेव्हा भडकलेले म्हेत्रे म्हणाले, तुम्हाला शिस्त नाही. आम्ही काय वेळ काढून गोट्या खेळायला बसलो आहे काय? गावात दाखवण्यासाठी पदाधिकारी होता का? अशा शब्दात म्हेत्रे यांनी खडसावले. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय