शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

रोषणाईतून जणू दिवाळी साजरी करताना लोकांंनी चौकाचौकात उत्स्फूर्तपणे लावले ‘लोकमत’चे बोर्ड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:10 IST

सोलापूर : यंदाच्या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत हजारो सोलापूरकरांनी आपल्या वास्तूंवर विद्युत रोषणाई करुन सोलापुरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. ...

ठळक मुद्दे ‘लोकमत’, वीरशैव व्हिजनच्या उपक्रमाचे तोंडभरुन कौतुक  ‘मिशन प्रकाशमय यात्रा-२०१९’ लोकमतची ही संकल्पना‘बदलतं सोलापूर-बदलती यात्रा’ याची प्रचितीही सोलापूरकर मंडळी घेत आहेत

सोलापूर : यंदाच्या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत हजारो सोलापूरकरांनी आपल्या वास्तूंवर विद्युत रोषणाई करुन सोलापुरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे ‘लोकमत’ अन् ‘वीरशैव व्हिजन’ यांच्या नावाचे बोर्डही सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे चौकाचौकात लावले. 

जुने ते सोनं, यानुसार ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील पूर्वीची परंपरा यंदा दिसून आली. घराघरांवर, दुकानांवर, चौकाचौकात अन् नंदीध्वज मार्गावर भक्तगणांनी विद्युत रोषणाई केल्याने यंदाची यात्रा लख-लख प्रकाशात उजळून निघाली आहे.

सोमवारी अक्षता सोहळ्यावेळी विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी ‘लोकमत’, वीरशैव व्हिजनच्या उपक्रमाचे तोंडभरुन कौतुक केले.२ डिसेंबरच्या हिरेहब्बू वाड्यात आयोजित भक्तगणांच्या बैठकीत पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे आणि माजी नगरसेवक नंदकुमार मुस्तारे यांनी यात्रेला पुनश्च वैभव मिळावे यासाठी भक्तगणांनी आपल्या घरांवर, दुकानांवर, सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधींनी नंदीध्वज मार्गावर आणि प्रमुख चौकात विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन केले होते.

‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकून भक्तगणांपर्यंत संदेश पोहोचविला होता. वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी हा संदेश एक आव्हान म्हणून स्वीकारले. व्हिजनचे पदाधिकारी, सदस्यही सरसावले. विद्युत रोषणाई करण्याबाबत जनजागरण मोहीम हाती घेत शहरातील सर्वच जाती-धर्मातील घटकांपर्यंत पत्रके पोहोचवली, प्रत्येकाला हात जोडून विनंती करण्यात आली. म्हणता-म्हणता अवघ्या काही दिवसांमध्ये त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला.

 ‘मिशन प्रकाशमय यात्रा-२०१९’ लोकमतची ही संकल्पना हाती घेऊन व्हिजनने चांगलाच पुढाकार घेतल्यामुळेच आज शहर प्रकाशमय तर झाले आहेच. शिवाय ‘बदलतं सोलापूर-बदलती यात्रा’ याची प्रचितीही सोलापूरकर मंडळी घेत आहेत. 

अक्षता सोहळ्यातही कौतुकाचा वर्षाव !- सम्मती कट्ट्यावर अक्षता सोहळा सुरु असताना वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी निवेदन करताना शहरातील झळाळी मोहिमेचा अनेकवेळा गौरव केला. सोलापूरच्या इतिहासात न भूतो न भविष्यती अशी मोहीम सुरु झाल्याबद्दल उपस्थित भक्तांमध्येही मोठ्या कौतुकानं चर्चा सुरु होती. या नव्या परंपरेमुळे यात्रेत नवा उत्साह संचारला होता. 

‘लोकमत’च्या पुढाकारातून वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून यंदा प्रथमच सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला झळाळी मिळाली. यात्रेच्या निमित्ताने शहर उजळून निघालं. खºया अर्थाने ही प्रकाशमय यात्रा ठरली. लोकमंगल ग्रुपने आपल्या सर्वच इमारतींवर विद्युत रोषणाई केली आहे. समतेच्या प्रकाशमय यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. -सुभाष देशमुख,सहकारमंत्री

गेल्या पाच-सहा दिवसांपासून शहरातील चित्र पाहताना दिवाळीचा भास होतोय. केवळ एकच समाज नव्हे तर विविध समाजातील मंडळींनी केलेल्या विद्युत रोषणाईमुळे यात्रा उजळून निघाली. ‘लोकमत’चे खरेच कौतुक करतो. वीरशैव व्हिजननेही चांगलाच पुढाकार घेतला. -संजय शिंदे, अध्यक्ष- जिल्हा परिषद.

वाटलं नव्हतं शहर लख-लख दिव्यांनी उजळून निघेल. ही किमया केवळ ‘लोकमत’च करु शकतं. आज शहर उजळून निघालं आहे. यापुढे यात्रेचे वैभव वाढत जाणार आहे. सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. -मिलिंद थोबडे,अध्यक्ष- महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल. 

खºया अर्थाने ‘लोकमत’ची संकल्पना अन् वीरशैव व्हिजनच्या पुढाकाराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आज प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी पुढे येऊन विद्युत रोषणाई केली आहे, याचा विशेष आनंद आहे.-धर्मराज काडादी,-अध्यक्ष, पंच कमिटी

मी जेव्हा ‘लोकमत’मध्ये प्रकाशमय यात्रेबद्दल वाचलो, तेव्हा काँग्रेस भवनावर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला. वीरशैव व्हिजनने पुढाकार घेतल्यामुळेच यात्रा उजळून निघाली. ‘लोकमत’ला धन्यवाद देतो. -प्रकाश वाले,शहराध्यक्ष-काँग्रेस

पूर्वी यात्रेनिमित्त लोक लाईटिंग करायचे. अलीकडे ती प्रथा खंडित झाली. ‘लोकमत’ आणि वीरशैव व्हिजनने पुढाकार घेतल्याने यंदा प्रथमच ती प्रथा सुरु झाली, याचा विशेष आनंद आहे.-अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष- भाजपा.

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेत समतेचा संदेश दिसतो. त्या संदेशाला झळाळी मिळावी अन् समतेचे दर्शन घडावे यासाठी मीही या उपक्रमात सहभागी झालो आहे. ही परंपरा पुढे सुरु रहावी. -आनंद चंदनशिवे, नगरसेवक -बसपा.

ग्रामदैवतामुळे आजवर कुठले संकट आले नाही. त्याची कृपा म्हणून प्रत्येक जण प्रकाशमय यात्रेत सहभागी झाला. ‘लोकमत’, वीरशैव व्हिजनचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यंदाच्या यात्रेत त्यांच्यामुळेच यात्रा प्रकाशमय झाली. -पुरुषोत्तम बरडे, शिवसेना.

लोकमत आणि वीरशैव व्हिजनने यंदाच्या यात्रेपासून एक चांगला पायंडा पाडला. या मोहिमेत मी स्वत: सहभागी झालो, याचा विशेष आनंद आहे. यात्रा प्रकाशमय करण्यासाठी इतरांनीही सहभाग नोंदवावा.-संतोष पवार,कार्याध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा