शौचाहून हॉटेलकडे परतताना दुचाकीस्वाराने उडवल्याने पादचारी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:22 IST2021-04-08T04:22:53+5:302021-04-08T04:22:53+5:30
या अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, यातील मयत गोकुळ हा फिर्यादी रामेश्वर हनुमंत मारकड (वय ५१ रा. ...

शौचाहून हॉटेलकडे परतताना दुचाकीस्वाराने उडवल्याने पादचारी जागीच ठार
या अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, यातील मयत गोकुळ हा फिर्यादी रामेश्वर हनुमंत मारकड (वय ५१ रा. रा. हिंगणगाव ता.परांडा) यांच्या आत्याचा मुलगा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या हॉटेलमध्ये कामास आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास शौचास गेला होता. हॉटेलकडे परतत असताना त्यास (एम. एच.१३ सीडी ६४४६) या स्कुटीवरुन येणारा महंमद गौस शेख याने जोराची धडक दिली. यात गोकुळ रोडवर पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला. ही घटना समजताच नातलगांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. मात्र, तो मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. याचा पंचनामा पोलीस हवालदार जनार्धन सिरसाट यांनी केला. पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मयताचा नातेवाईक रामेश्वर हनुमंत मारकड (वय ५१, रा. हिंगणगाव) यांच्या फिर्यादीनुसार चालक महमंद गौस जहिरुद्दीन शेख (रा. अलीपूर रोड बार्शी) याच्याविरुद्ध भादंवि २७९, ३०४ अ, मोटार वाहन कायदा १८४, १७७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.