दुचाकीच्या धडकेने सौंदरेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:27 IST2021-02-25T04:27:36+5:302021-02-25T04:27:36+5:30

बार्शी : सौंदरे रस्त्यावरुन पेट्रोल पंपाकडे निघालेल्या पादचा-याचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू झाला. मारुती रामभाऊ कदम (रा.सौंदरे, ता. बार्शी) ...

Pedestrian killed in a two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेने सौंदरेत पादचारी ठार

दुचाकीच्या धडकेने सौंदरेत पादचारी ठार

बार्शी : सौंदरे रस्त्यावरुन पेट्रोल पंपाकडे निघालेल्या पादचा-याचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू झाला.

मारुती रामभाऊ कदम (रा.सौंदरे, ता. बार्शी) असे मरण पावलेल्या तरुण पादचा-याचे नाव असून मंगळवारी रात्री १० च्या सुमारास हा अपघात घडला. याबाबत त्याची पत्नी सोनाली मारुती कदम (२८, रा. अमन चौक, बार्शी) हिने तालुका पोलीसात एका दुचाकी नं.(एम. एच. १३ बी.जे. ३५१६) स्वाराविरुद्ध फिर्याद दिली आहे.

बार्शी येथील खाजगी दवाखान्यात सोनाली या आया म्हणून काम करतात. मारुती हे मंगळवारी रात्रीच्यावेळी सौंदरे जवळच दडशींगे फाट्याजवळ पेट्रोल पंपाकडे निघाले होते. पाठीमागून येणा-या वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या अपघातानंतर बघ्यांनी सोनाली यांना फोनवरुन माहिती दिली. दरम्यान मारुती यांना जखमी अवस्थेत एका टेम्पोतून बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Pedestrian killed in a two-wheeler collision