सांगोल्यात सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व

By Admin | Updated: January 24, 2017 20:26 IST2017-01-24T20:26:44+5:302017-01-24T20:26:44+5:30

सांगोल्यात सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व

Peak dominance in Sangola for 45 consecutive years | सांगोल्यात सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व

सांगोल्यात सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व

सांगोल्यात सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व
अरुण लिगाडे - सांगोला आॅनलाईन लोकमत
पंचायत समितीच्या सन १९६२ स्थापनेपासून सुरुवातीचे काँग्रेसचे दहा वर्षे सभापतीपद वगळता सन १९७२ ते २०१७ असे शेकापचे आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सलग ४५ वर्षे पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता अबाधित आहे. पंचायत समितीच्या ५५ वर्षे सुवर्ण महोत्सवाच्या काळात काँग्रेसने २ तर शेकाप पक्षाकडून ४ महिला व ९ पुरुषांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे. यामध्ये अकोला (ता. सांगोला) येथील शेकापचे ज्येष्ठ नेते कै. जगन्नाथराव लिगाडे हे सलग १८ वर्षे सभापतीपदावर राहिले. त्यानंतर नाझरा येथील कै. वसंतराव पाटील यांना ७ वर्षे सभापतीपदाचा कार्यकाल मिळाला.
सांगोला पंचायत समितीची स्थापना सन १९६२ साली झाली. स्थापनेपासून ५५ वर्षांच्या काळात तब्बल १५ सभापती पंचायत समितीस लाभले. मेडशिंगी (ता.सांगोला) येथील काँग्रेसचे कै. संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांना सन १९६२ साली पहिले सभापती होण्याचा मान मिळाला. त्यांनी १९६२ ते १९६९ असे सात वर्षे सभापती म्हणून काम पाहिले. त्यानंतर काँग्रेसचे महादेव भोसले यांनी १९६९ ते १९७२ असे तीन वर्षे सभापतीपदावर राहिले. पंचायत समितीच्या स्थापनेनंतर सलग दहा वर्षे काँग्रेसच्या ताब्यात पंचायत समिती होती. त्याकाळी १९६२ ते १९७२ या कालावधीत शेकापकडून गणपतराव देशमुख हे विधानसभा सदस्य असूनही पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यानंतर मात्र, सन १९७२ ते २०१७ आजतागायत सांगोला पंचायत समितीवर आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व राहिले आहे़
---------------------------
यांना मिळाली सभापती पदाची संधी
आ. डॉ. देशमुख यांनी पक्षातील निवडून येणाऱ्या सदस्यांना आरक्षणनिहाय सभापतीची संधी दिली आहे. यामध्ये सन १९९७-१९९८ कुसुम चौगुले, १९९८-१९९९ रंभाजी पाटील, १९९९-२००० भारती कांबळे, २००१ -२००२ राहुल काटे, २००२-२००५ विलास काशीद, २००५-२००७ बाळासाहेब काटकर, २००७-२००९ संभाजी आलदर, २००९-२०१२ बाळासाहेब काटकर, २०१२-२०१४ ताई मिसाळ, २०१४-२०१७ सुरेखा सूर्यगण यांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे़
------------------------
पुन्हा महिलाराज़़़
४येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत सभापतीपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी जाहीर झाले आहे. २०१२-२०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत आरक्षणानुसार अडीच-अडीच वर्षे दोन महिलांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे तर सन २०१७ च्या निवडणुकीनंतर अडीच वर्षे सभापतीपद महिलेकडे राहणार असल्याने सलग साडेसात वर्षे सांगोला पंचायत समितीवर महिलांचे वर्चस्व असणार आहे.
----------------------------
पुरुषांबरोबर महिलांना संधी
पूर्वी निवडणूक आयोग नसल्यामुळे मंत्रिमंडळ सभापतीपदाचा कार्यकाल ठरवून देत होते. त्याकाळी सभापतीपदाचा कार्यकाळ ५ वर्षे राहिल्यामुळे कै. जगन्नाथराव लिगाडे हे १८ वर्षे पदावर राहिले. आता निवडणूक आयोग व आरक्षणानुसार महिलांनाही राजकारणात ५० टक्के आरक्षण असल्याने सभापतीपदाचा कार्यकाल अडीच अडीच वर्षे आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने पंचायत समितीमध्ये महिलांनाही सेवा करण्याची संधी मिळत आहे.

Web Title: Peak dominance in Sangola for 45 consecutive years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.