‘आदिनाथ’ कारखाना पवार कवा बरं सुरू करणार हाईत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:41+5:302021-08-21T04:26:41+5:30
आदिनाथवर राज्य शिखर बँकेचे १२८ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने बँकेने कारखाना लिलावात काढला. विशेष म्हणजे कारखान्याच्या गोडाऊनमध्ये शंभर कोटी ...

‘आदिनाथ’ कारखाना पवार कवा बरं सुरू करणार हाईत!
आदिनाथवर राज्य शिखर बँकेचे १२८ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने बँकेने कारखाना लिलावात काढला. विशेष म्हणजे कारखान्याच्या गोडाऊनमध्ये शंभर कोटी रुपयांची साखर शिल्लक होती. तरीही शिखर बँकेने अवघ्या २८ कोटी रुपयांच्या कर्जासाठी कारखान्याचा लिलाव कोणाच्या आशीर्वादाने झाला, याची कुजबुज तालुकाभर रंगली. बारामतीच्या पवारांनी लिलाव बोलीत कारखाना भाड्याने घेतला खरा; पण कारखान्यावर एनसीडीसी, नवी दिल्लीच्या वित्तीय संस्थेचे मुद्दल २५ कोटी व व्याजासह झालेल्या ४९ कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखाना १५ वर्षे नव्हे तर २५ वर्षे भाड्याने घ्यावयाचा या घोळात कारखान्याचा लिलाव होऊन वर्ष संपले तरी घोळ काही मिटेना. त्यामुळे अद्याप भाडेकरारही झाला नसल्याची कुजबुज कारखान्याच्या संचालकांत आहे. यंदा तब्बल ४० लाख मे. टन ऊस गाळपासाठी उभा आहे. शिल्लक उसाची चिंता सतावू लागलीय. पवारांनी अद्याप कारखान्यात पाय ठेवलेला नाही. आदिनाथ कधी ताब्यात घेणार व कधी सुरू करणार याविषयी पवार काहीच का बोलत नाही? यावरही शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत.
- नासी कबीर