शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पवारांनी खेळी करत भाजप अन् सेनेला सत्तेपासून रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 14:35 IST

सोलापुरातील सर्वसामान्य जनतेचे मत : युतीने एकत्र यावे, सेनेला मुख्यमंत्रिपद द्याव

ठळक मुद्देमागील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आम्ही पाहिला शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने आपल्या मित्रपक्षाचा मान ठेवला पाहिजेशरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत, तेच यंदा मुख्यमंत्री व्हावे

 सोलापूर : शिवसेनेकडे सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक पाठबळ दाखवण्यासाठी २४ तास असताना राजकारणात मुत्सद्दी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय खेळी केली़ आणि त्यांनी शिवसेना आणि भाजपला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले, असे मत सोलापूरकरांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर राज्यातील सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकदा एकत्र येऊन सत्ता स्थापन करावे याचबरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री करावा, अशी मागणीही सोलापूरकरांकडून होत होती.

सध्या सत्तेचा तिढा जरी कायम असला तरी मुख्यमंत्री हा काम करणारा पाहिजे़ मागील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आम्ही पाहिला आहे़ पण यंदा शिवसेनेला संधी दिली पाहिजे़ त्यांनाही मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने आपल्या मित्रपक्षाचा मान ठेवला पाहिजे़- उत्तम कांबळे, नागरिक

शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत़ तेच यंदा मुख्यमंत्री व्हावे़ त्यांना चांगला राजकीय अनुभव आहे़, हे राज्यानेही पाहिले आहे़ यामुळे राज्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे़ शरद पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणूनच कदाचित पवार यांनी राजकीय खेळी करत वेळेत शिवसेनेला पाठिंबा दिला नाही़-जालिंदर प्रभळकर

शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा न देता कोणतीही राजकीय खेळी केली नाही़ पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पाठिंबा दिला नसेल़ भाजपने मागील पाच वर्षांत केलेला कारभार पाहता यंदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हायला पाहिजे़ मागील पाच वर्षांत भाजपच्या लोकांनीही शिवसेनेला संपवण्याचा पूर्ण पयत्न केला़ यामुळे शिवसेनेला संधी मिळालीच पाहिजे़ - संजय उकरंडे 

राज्याची राजकीय स्थिती ही कोणाच्याही ध्यानीमनी नसताना असे घडत आहे़ मोठ्या प्रमाणात भाजपचे सीट निवडून आले़ यामध्ये शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट पकडून वेगळा झाला आहे़ शरद पवार हे राज्याचे किंगमेकर आहेत़ ते ऐंशी वर्षांचे असतानाही त्यांनी दोन्ही पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर विश्वास ठेवला, पण ते सोबत येणार आहेत का नाही, हे स्पष्ट होणे कठीण आहे.- जयराज नागणसुरे

दोन्ही काँग्रेसच्या खेळीला सेनेने बळी पडू नयेपूर्वी शिवसेना आणि भाजप यांनी सरकार स्थापन केले़ यंदा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यावे, त्यांनी शेतकºयांसाठी खूप आंदोलने केली आहेत़ यामुळे त्यांना संधी द्यावी.राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगे्रसने जी खेळी केली आहे त्याला शिवसेनेने बळी न पडता युती टिकवत शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकदा एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. अशा कुरघोड्या करणाºयांना धडा शिकवावा आणि आपली मैत्री अशीच टिकवून ठेवावी, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात येत होते.

शिवसेनेला संधी द्यामागील पाच वर्षांत शिवसेनेने खूप तडजोडी केल्या. भाजपसोबत फरफटत गेली़ भाजपसोबत जो मान पाहिजे तो मान काही मिळाला नाही़ पण यंदा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे