शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांना पितृशोक; जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 09:08 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचे जेष्ठ नेते  सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रें (वय ९१ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने  दुधनी येथील राहत्या घरी निधन झाले.

   दुधनी नगरपालिकेचे ते सलग ४0 वर्षे नगराध्यक्ष होते. त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव  राज्यात अव्वल स्थानी आणले होते.माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि अक्कलकोटकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे ते वडिल होते.

 सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीच्या जोरावर दुधनी भागासह संपूर्ण अक्कलकोट तालूका,विजापूर,गुलबर्गा सीमावर्ती भागात वेगळी ओळख निर्माण केली होती.तालूक्याच्या राजकीय पटलावर त्यांचा दबदबा होता.विशेष म्हणजे ते दुधनी नगरपालिकेवर ४० वर्षे बिनविरोध नगराध्यक्ष होते.

दुधनीसह तालूक्यातील अनेक वर्षापासूनची भांडणतंटे सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी त्यांच्या लोकन्यायालयातुनच मिटविले.धर्मकार्य आणि गोरगरिबांना दानधर्म करण्यासाठी सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नेहमीच हात पूढे असायचे.

१९७४ साली भाई छन्नोसिंग चंदेले यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.ते आमदार झाले;त्यांच्या आमदारकीसाठी सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा सिंहाचा वाटा होता.तेव्हापासून आजतागायत म्हेत्रे परिवार हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले.

सातलिंगप्पा म्हेत्रे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते होते, तसेच भाई छन्नोसिंग चंदेले, तत्कालीन मंत्री कै.नामदेवराव जगताप,माजी कृषीमंत्री शरद पवार, माजी मंत्री मल्लिकार्जून खर्गे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांची  निकट मैत्री होती. त्यांच्यावर शनिवारी  दुपारी २ वाजता  दुधनी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तालुक्याचा एकनिष्ठ व खंबीर नेता हरवल्याची खंत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेकांनी  व्यक्त केली. संपूर्ण अक्कलकोट तालूक्यासह जिल्ह्यात सातलिंगप्पा म्हेत्रे यांना भिष्मपितामह या नावाने संबोधले जायचे. 

टॅग्स :Solapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोटcongressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे