पाथरी : जुगार खेळताना ११ जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:41+5:302021-06-16T04:30:41+5:30

बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या नेतृत्वाखाली १४ जून रोजी हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे, पोलीस नाईक ...

Pathri: 11 people caught gambling | पाथरी : जुगार खेळताना ११ जणांना पकडले

पाथरी : जुगार खेळताना ११ जणांना पकडले

बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या नेतृत्वाखाली १४ जून रोजी हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस नाईक बोबडे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे, इक्बाल तडवी यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली. या पथकाने लिंबाच्या झाडाखाली गोलाकार करून जुगार खेळणाऱ्यांना गराडा घालून पकडले.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल इकबाल तडवी (वय २७) यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे करीत आहेत.

---

११ जणांवर कारवाई

या कारवाईत रणवीर उत्तम गायकवाड (वय ३८), प्रकाश नामदेव गायकवाड (वय ६४), प्रताप गिरिधर गायकवाड (वय ४०), विकास परिचंद गायकवाड (वय ४५), रावसाहेब सुखदेव सांगुळे (वय ४०), महादेव राजाराम कांबळे (वय ५२), नितीन विलास सांगुळे (वय ३२), गोरख उत्तरेश्वर कांबळे (वय ४७), हनुमंत प्रल्हाद सांगुळे (वय ५०), रामराजे अर्जुन गायकवाड (वय ४७), किरण अगतराव पवार (सर्व रा. पाथरी) या ११ जणांना पकडले.

Web Title: Pathri: 11 people caught gambling