पासपोर्ट कार्यालयामुळे सोलापूरचे पर्यटन वाढेल, अतुल गोतसुर्वे
By Appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 11:03 IST2017-07-29T11:01:27+5:302017-07-29T11:03:13+5:30
सोलापूर दि २९ : सोलापूर शहर हे झपाट्याने बदलू लागलंय़ स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेतेय. त्यातच सोलापूरला होत असलेलं पासपोर्ट कार्यालय म्हणजे देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेलच पण सोलापूरसाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकेल,

पासपोर्ट कार्यालयामुळे सोलापूरचे पर्यटन वाढेल, अतुल गोतसुर्वे
बाळासाहेब बोचरे : आॅनलाइन लोकमत
सोलापूर दि २९ : सोलापूर शहर हे झपाट्याने बदलू लागलंय़ स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेतेय. त्यातच सोलापूरला होत असलेलं पासपोर्ट कार्यालय म्हणजे देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेलच पण सोलापूरसाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकेल, असे प्रतिपादन सोलापुरात होणाºया पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख अतुल गोतसुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
सोलापूर येथे शनिवारी अद्ययावत पासपोर्ट कार्यालय सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता पासपोर्ट कार्यालयामुळे सोलापुरात लवकरच अनेक बदल झालेले पाहायला मिळतील, असे गोतसुर्वे म्हणाले. मूळचे चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील असलेले गोतसुर्वे यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये झाले असून, पुढील शिक्षण पुण्यात झाले. २००४ साली ते भारतीय विदेश सेवेत दाखल झाले.
पासपोर्ट असणे हे आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम असून, तो आपला मूलभूत हक्क आहे. यामुळे आपण कधीही पर्यटन, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकतो. अनेक आयटी कंपन्या किंवा इतरही व्यावसायी चांगल्या कंपन्या पासपोर्ट असल्याशिवाय नोकरी देत नाहीत. त्यामुळे पासपोर्ट ही आवश्यक बाब बनली आहे. सोलापूरच्या कार्यालयाला सध्या सहा जिल्हे जोडले असले तरी आणखी जिल्हे जोडले जाण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड व कोल्हापूर येथे पासपोर्ट कार्यालय आहे़ पण पुण्याच्या तोडीचे कार्यालय पुण्यानंतर सोलापुरातच झाले आहे. या सहा जिल्ह्यांतील कोणाही नागरिकाला जे कार्यालय सोयीचे वाटेल त्या ठिकाणी जाऊन ते अर्ज करु शकतात. विशेषत: सोलापूरसह नगर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांना सोलापूर सोयीचे होऊ शकते, असे गोतसुर्वे म्हणाले.
केरळसारखे राज्य परकीय चलन आणणारे मोठे राज्य आहे. या राज्यातून आखाती देशात जाणाºयांची संख्या मोठी आहे. महाराष्टÑातूनही पासपोर्ट प्रक्रिया जलद झाली तर परदेशी चलन आणण्यात वाढ होऊ शकते. सोलापूरला त्याचा फायदा होऊ शकतो, असे सांगून आॅनलाईन अर्ज केल्यानंतर कागदपत्रे तपासल्यापासून एक ते ४० दिवसांत नागरिकाला पासपोर्ट मिळू शकतो, असे गोतसुर्वे म्हणाले.
-----------------
पासपोर्ट मिळविण्याची प्रक्रिया अशी़़़
- पासपोर्ट कार्यालयात थेट येता येणार नाही. त्यासाठी अगोदर आॅनलाईन अर्ज करावा लागतो. आणि भेटीची वेळ आणि दिवस निश्चित केला जातो. आॅनलाईन अर्जाची प्रत दाखवणाºयांनाच भेट दिली जाते.
- ही प्रक्रिया दि. २८ जुलैच्या दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झाली आहे. त्यासाठी ६६६.स्रं२२स्रङ्म१३्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर जाऊन आपण आॅनलाईन अर्ज करु शकता. किंवा १८००२५८१८०० या टोल फ्री क्रमांकावर डायल करुन माहिती घेऊ शकता. मुलांसाठी एक हजार तर प्रौढांसाठी १५०० रुपये पासपोर्ट शुल्क असून, ते आॅनलाईन भरल्यानंतर त्याची पावती घेऊन दिलेल्या तारखेदिवशी कार्यालयात आपली कागदपत्रे दाखल करण्यासाठी यावे लागते.
- कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर पोलिसांकडून अहवाल मागवला जातो. ज्या व्यक्तीची चौकशी करण्याची गरज नाही असे वाटते त्यांना एक दिवसातही पासपोर्ट मिळू शकतो. अन्यथा ४० दिवसांत पासपोर्ट देण्याची प्रक्रिया पूर्ण होते.
-------------------------
बदलत्या सोलापूरला पासपोर्ट कार्यालय व्हावे ही आपली मनोमन इच्छा होती. विदेश सेवेत असल्याने त्याचा आपण पाठपुरावा केला. सोलापूरचे लोकप्रतिनिधीही पाठपुराव्यात कमी पडले नाहीत. सर्वांच्या प्रयत्नाने हे कार्यालय झाल्याचा मनोमन आनंद होत असून, जन्मगावासाठी काहीतरी केल्याचे समाधान व अभिमान वाटत आहे़
-अतुल गोतसुर्वे, प्रमुख, सोलापूर पासपोर्ट कार्यालय