शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

संतांच्या पालख्या पंढरीसमीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 05:19 IST

कोसो अंतर पार करीत विविध भागातील शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत़

पंढरपूर (जि. सोलापूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज या प्रमुख पालख्यांसह अन्य पालख्या पंढरी समीप आल्या आहेत. शिवाय कोसो अंतर पार करीत विविध भागातील शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत़. सर्व पालखी सोहळ्यांमध्ये सुमारे सहा लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो़पंढरीत दाखल होत असलेले वारकरी आपापले साहित्य मठ, मंदिर, धर्मशाळा आदी ठिकाणी ठेवून चंद्रभागेत पवित्र स्नान करून भाविकांची दर्शन रांगेत सहभागी होत आहेत. त्यामुळे गुरुवारी दर्शनरांग ही पत्राशेड व तात्पुरत्या शेडच्या पुढे गोपाळपूर रस्त्यापर्यंत गेली आहे़दिंड्यांची सोय ६५ एकर परिसरातआषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या दिंड्यांची सोय ६५ एकर परिसरात करण्यात आली आहे़ दिंड्यातील भाविकांसाठी या परिसरात वीज, पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य केंद्र आदी सर्वप्रकारची सोय करण्यात आली आहे़ दिंडीप्रमुखांनी आपण नोंदणी केलेल्या प्लॉटमध्ये तंबू मारावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी केले आहे़गोल रिंगण, उडीच्या खेळांनी घालविला शीणभागवेळापूर (जि. सोलापूर) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण गुरुवारी खुडूस फाटा येथील मैदानावर चैतन्यमयी वातावरणात पार पडले. निसर्गाने उत्तम साथ दिल्याने रिंगण सोहळा रंगला. तेवढाच रंग नंतर दिंडीकरांच्या उडीच्या खेळाला चढला. वारीतील या नव्या रंगात न्हाऊन निघालेले वारकरी आपला अवघा शीणभाग विसरले.सकाळी ११ वा.२२ माऊलींची पालखी खुडूस फाटा मैदानावर पोहोचली. तिथे आखलेल्या गोल रिंगणाभोवती लाखो वारकरी अगदी सकाळपासूनच जागा धरून बसले होते. रिंगणस्थळी माऊलींचे आगमन होताच चैतन्याची एकच लहर उठली. माऊली... माऊलीच्या गजराने आसमंत भारावून गेला होता. बाहेरच्या रिंगणातून दिंड्यांसह माऊलींनी प्रवेश केला. माऊली बाहेरच्या रिंगणातून नाचत डुलत ओट्यावर पोहोचली. त्यानंतर चोपदाराच्या आदेशानंतर रथापुढील दिंडी क्रमांक १४ असलेल्या भोपळे दिंडीमधील जरीपटकाधारक मानकºयाने रिंगण घातले. त्यानंतर माऊलीच्या अश्वांनी दोन रिंगण पूर्ण केले.माळीनगरात तुकोबारायांचे उभे रिंगणमाळीनगर (जि. सोलापूर):तुझ्या चरणाची धूळ, लागो माझ्या भाळी।सेवा घडावी जन्मोजन्मी तुझी, तूच आमुची माऊली।।सकाळचे आनंदी आणि उत्साही वातावरण, अकलूजच्या प्रस्थानानंतर अगदी जवळच असलेल्या ठिकाणी ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात व फुगडी, मनोरे आदी ग्रामीण खेळांचा आनंद घेत माळीनगर येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण गुरुवारी पार पडले. वारकºयांनी विठुनामाचा गजर करीत आनंदसाजरा केला.सकाळी सात वाजता सोहळा अकलूजचा मुक्काम संपवून माळीनगरकडे मार्गस्थ झाला. वाटेत मुक्कामी असलेल्या दिंड्या रोडवर येऊन सोहळ्यात सहभागी होत होत्या. सोहळा कर्मवीर चौकात आल्यावर त्या ठिकाणी आरती करण्यात आली. तोपर्यंत माळीनगर येथे प्रशासनाच्या वतीने रिंगणाची तयारी पूर्ण केली होती. बरोबर साडेआठ वाजता अश्व व नगारागाडीचे आगमन झाले. मॉडेल प्रशालेजवळ अश्व जाऊन थांबले. रिंगणाच्या मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSolapurसोलापूरPandharpurपंढरपूर